जनरल रावत उत्कृष्ट सैनिक, खरे देशभक्त! पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

121

तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. जनरल बिपीन रावत हे उत्कृष्ट सैनिक, खरे देशभक्त होते. देशातील सैन्य दलांचे आणि सुरक्षा व्यवस्था आधुनिकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रणनीतीवर त्यांची दूरदृष्टी आणि दृष्टीकोन हा अपवादात्मक होता. त्यामुळे त्यांचे आपल्यातून जाणं हे माझ्यासाठी अतिव दुःखदायक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले. पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांनी ही अतिशय दु:खद घटना असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देशासाठी अतिशय दुःखद दिवस- अमित शाह

अमित शहा ट्वीट करत म्हणाले की, “देशासाठी हा अतिशय दु:खद दिवस आहे. सीडीएस बिपीन रावत शूर सैनिकांपैकी एक होते, त्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा बजावली. त्यांचे देशाप्रतीचे योगदान शब्दांत मांडता येणार नाही. त्यांच्या निधनाने मला खूप वेदना होत आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. ‘श्रीमती मधुलिका रावत आणि अन्य 11 सशस्त्र दलातील कर्मचार्यांच्या निधनाबद्दल मी दु:खी आहे. माझ्या संवेदना या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. तसेच, कॅप्टन वरुण सिंग लवकर बरे होण्यासाठी माझ्या प्रार्थना आहे,’ असे शाह यांनी आपल्या शोक संदेशात नमूद केले.

( हेही वाचा : बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचे अपघाती निधन )

देशाने एक शूर मुलगा गमावला- राष्ट्रपती रामनाथ कोविंद 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. जनरल बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांच्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. देशाने एक शूर मुलगा गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा ही अभूतपूर्व शौर्य आणि धैर्य दर्शवते. माझ्या सहवेदना कुटुंबासोबत आहेत.

दु:खद घटना- राजनाथ सिंह

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंगच्या तंदुरुस्तीसाठी मी प्रार्थना करतो. त्याच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.