बदलत्या जीवनशैलीचा सर्वांत मोठा परिणाम झाला आहे तो आपल्या आहारावर. पोळी भाजीची जागा आता फास्ट फूडने घेतली आहे. यात बर्गर, फ्रँकी, पिझ्झा, मोमोज, फ्रेंच फ्राइज (FRENCH FRIES) यांचा अधिक समावेश होतो. सध्या लोकांचा कल हा पौष्टीक पदार्थां ऐवजी जीभेचे चोचले पुरवण्याकडे जास्त झुकलेला आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राइज. त्याचा आकर्षक पिवळा रंग, जीभेवर रेंगाळणारी चव यामुळे कोणालाही सतत फ्राइज खावेसे वाटतील. पण या फ्राइजच्या अतीसेवनाचे भयंकर परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही नियमित फ्राइज खात असाल तर आत्ताच थांबा.
(हेही वाचा –Tips For eyes Care : ‘या’ टिप्स वापरून घ्या उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी)
संशोधकांचा दावा ..
चीनमधील हांगझोऊ येथील संशोधकांनी असा दावा केला आहे की फ्रेंच फ्राइज (FRENCH FRIES) खाण्यामुळे माणसांमधील नैराश्य आणि अस्वस्थतेचा धोका अधिक वाढत आहे.
त्यांनी केलेल्या संशोधनानुसार,
फ्रेंच फ्राइजचं (FRENCH FRIES) सेवन न करणाऱ्या व्यक्तिंपेक्षा तुलनेने वारंवार फ्राइज खाणाऱ्या माणसांमध्ये नैराश्याचे प्रमाण सात टक्के अधिक आहे. तर अस्वस्थतेचा धोका बारा टक्क्यांवर आहे.
कोणत्या रोगांचा धोका ..
जवळपास ११ वर्षे लाखभर लोकांच्या आरोग्याचा अभ्यास संशोधकांनी केला. त्यानुसार, जे जास्त प्रमाणात फ्राइज खातता त्यांना
– उच्च रक्तदाब
– लठ्ठपणा
– उच्च कोलेस्ट्रॉल
यासारख्या रोगांचा धोका अधिक असतो.
हेही पहा –
संशोधकांच्या निष्कर्षानुसार तळलेले पदार्थ (FRENCH FRIES) व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.
Join Our WhatsApp Community