Nashik: नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद

181
Water supply stopped in Nashik on Saturday
Nashik: नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद

येत्या शनिवारी २९ एप्रिलला नाशिक (Nashik) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य की काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

…यामुळे नाशिक (Nashik) येथे पाणीपुरवठा बंद

नाशिक (Nashik) मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर आणि महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ केव्ही एचटी वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. या पंपींग स्टेशनद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाईनची दुरुस्ती आणि पावसाळा पूर्व कामात सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण येथे करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Pune : पुणेकरांची ‘पाणी कपातीची’ चिंता तूर्तास मिटली)

तसेच नाशिक (Nashik) मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीस सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे करणे करीता वीजपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार २९ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच ३० एप्रिल २०२३ रविवार रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.