मुंबईतील कोविड रुग्णांचा आकडा कमी होत चालला असून, मंगळवारी दिवसभरात जिथे ५६२ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी रुग्णांमध्ये वाढ होऊन ६९२ नवीन रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे मंगळवारी जिथे ३१ हजार ७६९ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या, तिथे बुधवारी ३८ हजार ७८ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे वाढीव कोरोना चाचणीमुळे रुग्ण संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा २०च्या आतमध्ये असताना, हा आकडा २५ पर्यंत वाढल्याने थोडाफार चिंतेचा विषय आहे.
अशी आहे आकडेवारी
मुंबईमध्ये बुधवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ही ८ हजार ३५१ एवढी आहे. त्यामुळे सक्रीय रुग्ण आणि नवीन आढळून येणारे रुग्ण यांची संख्या कमी होत असल्याने, मुंबईकरांसाठी ती समाधानाची बाब आहे. तर दिवसभरात एकूण ६८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी जिथे १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली हेाती, तिथे बुधवारी २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या मृत्यूपैकी १७ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. तर यामध्ये १७ रुग्ण हे पुरुष, तर ८ महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील २ मृत पावलेले रुग्ण हे चाळीशीच्या आतील असून, १३ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत. उर्वरित १० रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत.
#CoronavirusUpdates
३० जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ६९२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६८०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९६१०५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ८३५१
दुप्पटीचा दर- ७१६ दिवस
कोविड वाढीचा दर ( २३ जून ते २९ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 30, 2021
मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा दर हा मंगळवारी ७२१ दिवसांवर आला होता. बुधवारी हा दर ७१६ दिवसांवर आला आहे. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण असले, तरी सक्रीय कंटेन्मेंट असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या ११ एवढी आहे, तर सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या ८० एवढी आहे.
Join Our WhatsApp Community