बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला चौकशीसाठी बोलावले होते, मात्र, त्यानंतर राज कुंद्रा याला अटक करण्यात आली.
अश्लील चित्रपट निर्मितीचा आरोप!
सात ते आठ तास चौकशी केल्यावर अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले होते. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानुसार कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. २० जुलै रोज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा : फेरबदलाच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी! भाजपचे मात्र नाराजांवर लक्ष!)
याआधीही कुंद्राविरुद्ध पोलिसांत तक्रार!
राज कुंद्रा पहिल्यांदाच पोलिसांना सामोरे जात नाही. याधीही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयाची पायरी चढावी लागली होती. मार्च २०२० मध्ये राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईत राहणारे NRI सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. २०१४ मध्ये झालेल्या एका प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित प्रकरण हे प्रकरण होते. २०१४ ला तक्रारदार आणि राज कुंद्रा – शिल्पा शेट्टी यांच्यात देवाण-घेवाणीवर वाद झाला होता. याप्रकरणी NRI सचिन जोशी यांनी तक्रार दाखल केली होती.
Join Our WhatsApp Community