दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो हजारो मैल प्रवास करून वाशी खाडीकडे जमले आहेत. एका बाजूला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण असताना या परदेशी पाहुण्यांनी मात्र संचारबंदीचे वातावरण असतानाही आकाशातून विहार करत भारतभूमी गाठली आणि त्यातही नवी मुंबईच्या खाडीकडे येऊन आपले बस्तान मांडले. त्यांच्या या आगमनाने मुंबई आणि परिसरातील नागरिकांना तेवढाच काहीसा आल्हाददायी अनुभव मिळत आहे. २०१९ पासून स्थानांतर करणाऱ्या फ्लेमिंगोंचा संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने म्हटले आहे. २०१९ मध्ये १ लाख २० हजार फ्लेमिंगो आले होते, २०२० मध्ये ही संख्या १ लाख ५० हजार होती, यंदाच्या वर्षीही हे संख्या तितकीच आहे.
Join Our WhatsApp Communityसंचारबंदीत आकाशातून विहार करत फ्लेमिंगोंची हजेरी!
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण असताना या परदेशी पाहुण्यांनी मात्र संचारबंदीचे वातावरण असतानाही आकाशातून विहार करत भारतभूमी गाठली आहे.