मागील तीन दिवसांपासून मुंबईत जिथे रुग्णसंख्येचा आकडा खाली उतरत असतानाच बुधवारी दिवसभरत ३ हजार ८७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रुग्णांची संख्या २ हजार ५५४ एवढी होती. त्यामुळे वाढत्या चाचण्यांमुळे रुग्णसंख्याही आता वाढू लागल्याचे दिसून येत आहे.
अशी आहे आकडेवारी
मुंबईत बुधवारी दिवसभरात एकूण ३ हजार ६८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बुधवारपर्यंत ५१ हजार ४७२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. दिवसभरात ३५ हजार ३७७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर दिवसभरात ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५६ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ५६ पुरुष व २१ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ६ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ४० रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा ३१ एवढा होता. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर मंगळवारी ११६ होता, तिथे बुधवारी तो १२३ दिवसांवर आला.
Join Our WhatsApp Community