दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लोअर परळ पूल (Lower Parel Bridge) १५ जुलैआधी खुला होणार आहे. त्यामुळे करीरोड, वरळी आणि लोअर परळमधील (Lower Parel Bridge) वाहतूक कोंडीवर उतारा मिळणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी या पुलाची पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
(हेही वाचा –कोकण रेल्वे सुसाट! उन्हाळ्यात चाकरमान्यांसाठी धावणार विशेष गाड्या, पहा वेळापत्रक)
‘कॉर्पोरेट हब’ अशी ओळख निर्माण केलेल्या वरळी, लोअर परळ, करीरोड, महालक्ष्मी या परिसरातील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील अनेकांना लोअर परळचा डिलाइल रोड पूल हा प्रवासाचा सोयीचा मार्ग होता. मात्र हा पूल (Lower Parel Bridge) धोकादायक ठरवण्यात आल्याने जुलै २०१८ मध्ये तो बंद करण्यात आला. यानंतर पाडकाम करून पुलाची उभारणी १० महिन्यात करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात पाडकामासह मंदावलेली कामे आणि कोरोनाची साथ यांचा फटका या पुलाच्या उभारणीला (Lower Parel Bridge) बसला.
हेही पहा –
पहिला टप्पा मे महिन्यात….
एन. एम. जोशी मार्ग लोअर परळ (Lower Parel Bridge) येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाचा पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस सुरु होईल आणि संपूर्ण पुलाचे (Lower Parel Bridge) काम १५ जुलैच्या आधी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी मुंबई महापालिका आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. लोअर परळ पूल (Lower Parel Bridge) धोकादायक असल्याने तो पाडून नव्या पुलाची उभारणी सुरू करण्यात आली होती. परंतु मधल्या काळात काही कारणास्तव पुलाचे (Lower Parel Bridge) काम संथ गतीने सुरु होते. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामाने गती घेतली असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community