‘लाव रे तो व्हिडिओ’चा जन्म कसा झाला? असा नाविन्यपूर्ण प्रयोग कसा सूचला? असा प्रश्न एका कार्यक्रमात लाईव्ह मुलाखत घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला, तेव्हा राज ठाकरे Raj Thackeray interview यांनी खुलासा केला. लाव रे तो व्हिडिओचा ही संकल्पना सभांमधून मी प्रथम आणली नाही. तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल की, मुंबई शहरातील अनधिकृत झोपडपट्टींचे फोटो काढले होते. त्यावेळी व्हिडिओ वगैरे काही नव्हते. त्याचे एक प्रेझेंटेशन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रंगशारदा येथे दिले होते. ते प्रेझेंटेशन देत असताना ती झोपडपट्टी कोणत्या विभागात नवीन तयार झाली, तिकडचा नगरसेवक कोण, तिकडचा आमदार कोण आणि तिकडचा खासदार कोण, याबाबत सांगितले होते. त्यावेळी बरेचसे नगरसेवक, आमदार शिवसेनेचे होते. खासदार काँग्रसचे होते, काही भाजप आणि काही अन्य पक्षांचे होते. हे प्रेझेंटेशन करत असताना ऑडिओ-व्हिज्युअलचा वापर केला होता, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
(हेही वाचा ‘…तर मी घरचे काम करायला तयार’: मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ प्रश्नावर राज ठाकरेंचे उत्तर)
सरकार आरसा म्हणून ही गोष्ट दाखवली गेली पाहिजे मी अॅडव्हरटायझिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे ऑडिओ-व्हिज्युअलचा प्रभाव जेवढा तुमच्यावर पडतो, तेवढा अन्य गोष्टींचा पडत नाही. एक व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो, ते तुम्ही कितीही बोललात तरी ते समजण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. अनेकदा व्यंगचित्र काढताना, व्यंगचित्रातून जी गोष्ट मांडू शकतो, तेवढी कदाचित लेखातून मांडू शकणार नाही. व्हिज्युअल जास्त प्रभाव पाडत असते. अशा प्रकारे सरकार आरसा म्हणून ही गोष्ट दाखवली गेली पाहिजे. मग ते सरकार कुणाचेही असो. तुम्ही ही गोष्ट दाखवली त्याचे काय झाले, असे प्रश्न विचारले पाहिजे. त्यातूनही ती गोष्ट होत नसेल आणि त्याकडे दुर्लक्ष करून मतदान होत असेल, तर मग कसली लोकशाही आपण घेऊन बसलो, असे स्पष्ट मत राज ठाकरे Raj Thackeray interview यांनी व्यक्त केले. दरम्यान, लाव रे तो व्हिडिओ याची धार कमी झाल्यासारखी वाटते का, असा प्रश्नही राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ज्या वेळेला मला टीका करायची असेल तेव्हा मी टीका करणार. निश्चित करणार. परंतु, सरकारकडून चांगली कामे होत असतील, झाली, तर त्याची मोकळेपणाने स्तुतीही करावी, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
(हेही वाचा Raj Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांना राज ठाकरेंनी दिला सल्ला, उद्धव ठाकरेंविषयी म्हणाले… )
Join Our WhatsApp Community