गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहेत. भर उन्हाळ्यात देखील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे उन्हाचा पारा देखील उंचावला आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार २६ एप्रिल रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे.
(हेही वाचा –Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचे संकट! शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान)
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमध्ये हा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. सोयगाव तालुक्यातील आमखेडा आणि जरंडी परीसरात अर्धा तास वादळी पाऊस झाला. यामध्ये केळी, गहू, ज्वारी व मका पिकांचे नुकसान झाले असून अनेक झाडे कोसळली. तर आमखेड्यात तीन घरावरील पत्रे उडाल्याने अंदाजे १७ जण जखमी झाले आहेत.
हेही पहा –
१७ जण जखमी
आमखेडा येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे (Unseasonal Rain) अस्वार, गणेश अस्वार व लक्ष्मण अस्वार यांच्या घरावरील पत्रे उडाली आणि त्यावरील दगड अंगावर पडून १७ जण जखमी झाले. लक्ष्मीबाई राजेंद्र जाधव (वय २५ वर्षे), ईश्वर तुकाराम बडक (वय ४५ वर्षे), पूजा राजेंद्र जाधव (वय ३ वर्ष), दीदी राजेंद्र जाधव (वय २ वर्षे) आणि रत्नाबाई संदीप मिसाळ (वय ३२ वर्षे) यांचासह अनेक जखमी झाले आहेत. जखमींना गावकऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
अवकाळी पावसामुळे वाहतूक ठप्प
सोयगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील जुने मोठे लिंबाचे झाड (Unseasonal Rain) पडले, तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडे विद्युतवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक झाडं कोसळल्याने रस्त्यावर काही तास वाहतूक ठप्प झाली होती.
Join Our WhatsApp Community