मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत बरीच चर्चेत आली. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेताना रॅपिड फायरमध्ये राज ठाकरे यांनी अमृता फडणवीस Amruta Fadanvis यांनी थेट विचारले, तुम्ही अजित पवार Ajit Pawar यांना एक शब्दात काय सल्ला द्याल, राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे हसत, यावर मी रत्नागिरीच्या माझ्या सभेत बोलणार होतो, पण तरीही ‘अजित पवार यांनी त्यांच्या काकांकडे लक्ष द्यावे’, असा सल्ला दिला. त्यावर अजित पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यावरून राजकरणात आणखी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
गुरुवारी, २७ एप्रिल रोजी माध्यमांनी अजित पवार Ajit Pawar यांना त्या मुलाखतीतील राज ठाकरे यांच्या सल्ल्याविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी जसे त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवले तसे मीदेखील माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन, असे प्रत्युत्तर दिले. अजित पवार हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार अशी सध्या चर्चा सुरु झाली आहे, अशा परिस्थिती अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तेही राज ठाकरे यांच्यानुसार नवा पक्ष काढणार आहे का, अशी चर्चा सुरु झाली.
Entertainment Entertainment Entertainment#RajThackeray #AmrutaFadanvis 😭
pic.twitter.com/67qDWSqPiY— Ganesh Pawar (@GaneshaSpeaks_) April 26, 2023
(हेही वाचा Raj Thackeray interview : ‘लाव रे तो व्हिडिओ’चा जन्म कसा झाला; राज ठाकरे म्हणाले…)
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस Amruta Fadanvis यांनी घेतलेली मुलाखत सध्या जोरदार गाजतेय. राजकीय वर्तुळात या मुलाखतीचे पडसाद पाहायला मिळत आहे. त्यात अमृता फडणवीसांनी काही नेत्यांची नावे घेत तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. त्यात अजित पवारांचेही नाव होते. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार Ajit Pawar यांना राज ठाकरेंनी काय सल्ले दिले. अजित पवार यांना काय सल्ला द्याल, असे राज ठाकरे यांना विचारले असता तेव्हा राज ठाकरे यांनी ‘मला अजित पवारांबाबत पाच तारखेच्या सभेत सविस्तर बोलायचेय. बाहेर जेवढे लक्ष देतायत त्यापेक्षा जास्त काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला राज यांनी दिला होता.
(हेही वाचा Raj Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांना राज ठाकरेंनी दिला सल्ला, उद्धव ठाकरेंविषयी म्हणाले… )
Join Our WhatsApp Community