फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी; टाऊन वेंडिंग कमिटीची ३ मे रोजी बैठक

मागील अनेक वर्षांपासून मुंबईत फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी रखडले आहे. या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून २०१४ मध्ये फेरीवाल्यांचा सर्वे करण्यात आला होता.

334
फेरीवाला धोरण
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी; टाऊन वेंडिंग कमिटीची ३ मे रोजी बैठक

मुंबईत फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अखेर तब्बल ३ वर्षांनी नगर पथ विक्रेता समिती (टाऊन वेंडिंग कमिटी- TVC)ची बैठक होणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार असून यासाठी संबंधित प्रतिनिधींना कामगार आयुक्तांलयामार्फत निवडून यावे लागणार आहे. त्यामुळे यासाठीच्या निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध करणे या बाबीच्या प्रक्रियेला मंजुरी घेण्यासाठी ही बैठक होणार असून ही बैठक येत्या ३ मे २०२३ ला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मागील अनेक वर्षांपासून मुंबईत फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी रखडले आहे. या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून २०१४ मध्ये फेरीवाल्यांचा सर्वे करण्यात आला होता. या सर्वेत १ लाख २८ हजार ४४४ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात संपूर्ण मुंबईतून ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. पण छाननीनंतर १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र ठरले होते. मात्र महापालिकेने ४०४ मार्गांवर ३० हजार ८३२ फेरीवाले बसतील अशा जागा निश्चित केल्या होत्या. त्यामुळे यासाठी मुख्य नगर पथ विक्रेता समिती आणि परिमंडळीय पथ विक्रेता समित्या बनवण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिली बैठक नोव्हेंबर २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये मे आणि ऑक्टोबर महिन्यात दोन बैठका झाल्या आणि शेवटची बैठक जानेवारी २०२० मध्ये झाली होती.

(हेही वाचा –  मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयांची ओळख पुसली)

त्यानंतर नगर पथ विक्रेता समितीची बैठक झालीच नाही. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची कामगार आयुक्तांलयामार्फत करून या प्रतिनिधींची निवडणूक घेऊन त्यातून ही निवड करण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींच्या नावांची यादी तयार करण्यात आली असून या प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यासाठी मतदार यादी आणि त्याबाबतच्या निकषांना नगर पथ विक्रेता समितीची मंजुरी आवश्यक आहे. या समितीच्या मंजुरी नंतर फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची मतदार यादी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.