भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी बुधवारी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा मंथन कार्यक्रमात केले. सध्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितला आहे.
कोणती भाकरी फिरवायची ते #शरद पवारांनाच विचारा – मुख्यमंत्री #एकनाथ शिंदे
https://t.co/lIQdbcrLcc@mieknathshinde @PawarSpeaks #EknathShinde #SharadPawar #statement #NewsUpdate
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 27, 2023
माध्यमांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपण समजला पाहिजे. पक्ष संघटनेते नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादा यांना दूर करायला पाहिजे. हे सरळ क्लिअर होते. पाहिजे तर तुम्ही सकाळचा जो भोंगा वाजतो त्यांना विचारा. भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ काय होतोय?
(हेही वाचा – उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे कपडे टरा-टरा फाडेन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा)
पुढे म्हस्के म्हणाले की, गेल्या आठवड्यात पवार कुटुंबियात खासदारकीच्या उमेदवारीवरून अंतर्गत गृहकलह झाला. आणि त्याच्यानंतर सगळे रामायण घडले आहे. पवार परवा म्हणाले, संजय राऊत पत्रकार आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात. त्यामुळे गृहकलह कशामुळे झाला याची माहिती काढा. नाहीतर भोंग्याला विचारा. कारण संजय राऊतांचे शिवसेनेपेक्षा जास्त राष्ट्रवादीसोबत निष्ठा आहे. अजित पवारांना बाजूला करण्याकरिता सर्व काही खटाटोप राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. भाकरी फिरवली पाहिजे, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, हा रोष आणि हा रोख अजित पवार यांच्याकडेच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community