Bhiwandi : काळा साबण बनवणाऱ्यांचे काळे धंदे आले उघडकीस

भिंवडी तालुक्यातील कांबे गाव परिसरातील तळवली नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.

195

भिवंडी (Bhiwandi) येथे साबणाच्या नावाखाली गैरव्यवहार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळा साबण बनवणाऱ्या गोदामावर निजामपुरा पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी २०० लिटर ज्वलनशील रसायनाचे १०० ड्रम जप्त करण्यात आले आहेत. त्या सर्व ड्रमची एकूण किंमत ६० हजार इतकी आहे. या संबंधित एकाला अटक करण्यात आली आहे.

ज्वलनशील पदार्थांची केलेली साठवणूक

भिंवडी (Bhiwandi) तालुक्यातील कांबे गाव परिसरातील तळवली नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. मैनद्दीन मिनीर अहमद खान (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मैनुदीन याने संबंधित शासकीय विभागाकडून कोणताही परवाना घेतला नव्हता. तसेच आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी विविध प्रकारचे ज्वनलशील रासायनिक पदार्थ बेकायदेशीररीत्या आपल्या गोदामात साठवून ठेवले होते.

(हेही वाचा कोणती भाकरी फिरवायची ते शरद पवारांनाच विचारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

या ज्वलनशील पदार्थांचा साठा काळा साबण बनवण्यासाठी वापरला जात होता. गरजेच्या संरक्षणाशिवाय अथवा योग्य उपाययोजना न करता हे साबण बनवले जात होते. या रसायनामुळे मानवाच्या किंवा प्राणांच्या जीवाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे मैनुदीन याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. (Bhiwandi)

तरीही काही भागात अवैध धंदा सुरू

कांब गाव, खाडीकिनारी व इतर अनेक ठिकाणी ज्वलनशील रसायनांचा वापर करून काळा साबण बनवण्याचा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील व्यापाऱ्यांची या व्यवसायावर पकड आहे. अशा (Bhiwandi) अवैध व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.