Mango Season: आंबा गोड आहे की आंबट, कसा ओळखावा?

आंबा खरेदी करताना तो गोड आहे की आंबट हे बाहेरून ओळखता आले तर पैसे फुकट जाणार नाहीत. पण आंबा गोड आहे की आंबट हे ओळखायचे कसे? ते जाणून घ्या. (Mango Season)

337
Mango Season आंबा
Mango Season: आंबा गोड आहे की आंबट, कसा ओळखावा?

उन्हाळ्यात येणाऱ्या घामाच्या धारांनी जीव अगदी नकोसा होऊन जातो. पण या उन्हाळ्यात एका फळाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. ते फळ म्हणजे आंबा. फळांचा राजा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आंब्याची गोडी अवीट आहे. बाजारात ८००-९००च्या पुढे असणारे आंबे अनेकदा बजेटच्या पलीकडे असूनही सर्वसामान्य माणसे आवडीने खरेदी करतात. पण अनेकदा इतके पैसे खर्च करून जो आंबा घरी आणला जातो, तो आंबट निघतो. तेव्हा पश्चाताप करण्यावाचून दुसरे काही हातात राहत नाही. कधी अज्ञानामुळे तर कधी विक्रेत्याच्या चलाखीमुळे ग्राहकाची फसवणूक होते. अशावेळी आंबा खरेदी करताना तो गोड आहे की आंबट हे बाहेरून ओळखता आले तर पैसे फुकट जाणार नाहीत. पण आंबा गोड आहे की आंबट हे ओळखायचे कसे? (Mango Season)

आंबा आतून गोड आहे की आंबट हे ओळखण्यासाठी…

१. हलक्या हाताने दाबून पाहावे

आंबा आतून पिकला आहे की नाही हे ओळखण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे तो हलक्या हाताने दाबून पाहाणे. आंब्यावर हलका दाब दिल्यावर जर आंबा दबला जात असेल तर तो आतून गोड लागेल. जर तो दबला गेला नाही तर तो तयार झालेला नाही असे समजावे. त्यामुळे असा आंबा घेणे केव्हाही टाळावे. (Mango Season)

(हेही वाचा – आंबा खरेदी करताय? ‘या’ टीप्सचा नक्की होईल उपयोग

२. सुगंध घेऊन पाहावे

आंब्याचा सुगंध काहीसा तिखट किंवा व्हिनेगरसारखा वाटला तर तो आंबा खाण्यासाठी अयोग्य आहे. त्यामुळे ज्या आंब्याचा सुगंध नाकाला गोड वाटेल तो आंबा विकत घ्यावा.

३. तळाचा भाग

आंब्याच्या तळाचा भाग काळा किंवा गडद रंगाचा असेल तर तो कदाचित खराब झाला असेल. ज्या आंब्याचा तळ पिवळा किंवा हिरव्या रंगाचा असतो तो आंबा खाण्यासाठी योग्य असतो. (Mango Season)

(हेही वाचा – आंबा खाल्ल्यामुळे वजन कमी होते? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ)

४. देठाकडचा भाग

आंबा हातात घेतल्यावर बारकाईने निरीक्षण करा. दोन गोष्टींचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. पहिली गोष्ट म्हणजे आंब्याचा देठाचा रंग. त्याचा रंग झाडाच्या खोडासारखा असला पाहिजे. या शिवाय देठाच्या बाजूने बाकीचा आंबा वर आल्यासारखा वाटला पाहिजे. (Mango Season)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.