Eknath shide : मुख्यमंत्री शिंदेंची प्रथमच उद्धव ठाकरेंवर आक्रमक टीका; म्हणाले…

दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशी टीका शिंदे यांनी केली.

267
मुख्यमंत्री शिंदेंची प्रथमच उद्धव ठाकरेंवर आक्रमक टीका
मुख्यमंत्री शिंदेंची प्रथमच उद्धव ठाकरेंवर आक्रमक टीका

तीन दिवसांच्या साताऱ्यातील गावचा दौरा करून आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shide हे उद्धव ठाकरेंविरोधात कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता आजवरचे सर्वाधिक आक्रमक टीका केली. काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असा इशाराही शिंदे Eknath shide यांनी दिला आहे.

(हेही वाचा कोणती भाकरी फिरवायची ते शरद पवारांनाच विचारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.