एकीकडे असह्य असलेल्या उन्हाच्या त्रास होत असतानाच नवी मुंबईकरांच्या समोर पुन्हा एकदा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. मोरबे धरणात पाणीसाठा कमी असल्याने हे पाणीसंकट निर्माण झाले आहेत.
( हेही वाचा : 100@ Mann Ki Baat : ‘मन की बात’ शंभरावा भाग होणार प्रसारित! केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘या’ अनोख्या उपक्रमांचे आयोजन)
नवी मुंबईत पाणीसंकट! महानगरपालिकेने काढले परिपत्रक
अल निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार उपलब्ध पाणी साठ्यातून ते योग्य रितीने पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पालिकेने आपल्या पत्रकात दिली आहे. त्यानुसार खालील नमूद केलेल्या विभागात एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करून कपात करण्यात येणार आहे.
- सोमवार – बेलापूर
- मंगळवार – कोपरखैरणे
- बुधवार – घणसोली
- गुरूवार – वाशी
- शुक्रवार – ऐरोली
- शनिवार – नेरूळ
- रविवार – तुर्भे
- सदर पाणी कपात दिनांक २८ एप्रिल २०२३ पासून अमंलात करण्यात येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
एकाच महिन्यात दोनदा पाणीटंचाई
जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्ती संदर्भातील कामांमुळे दहा- बारा दिवसांपूर्वीच नवी मुंबईत पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झालेली. पाणी नसल्याने लोक घरातले हंडे घेऊन पाण्याच्या शोधात निघालेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा होणाऱ्या पाणी कपातवरून नागरिक त्रस्त असल्याचे दिसत आहेत. जलसंपन्न महापालिका म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर यंदा पाणी कपातीचे संकट आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community