IRCTC : आता शेगावात सुरू होणार रेस्टॉरंट ऑन व्हिल्स! मिळणार सुप्रसिद्ध कचोरी

276
IRCTC

रेल्वेचा IRCTC हा विभाग सतत काही ना काही हटके करण्याच्या प्रयत्नात असतो. IRCTC मार्फत आता बुलढाण्यातील एका महत्त्वाच्या स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हिल्स’ उघडण्यात येणार आहे. साता समुद्रापार पोहोचलेली शेगावची प्रसिद्ध कचोरी शेगाव स्थानकातील ‘रेस्टॉरंट ऑन व्हिल्स’ मध्ये मिळणार आहे.

IRCTC चा नाव उपक्रम

राज्यातल्या नागपूर, चिंचवड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हिल्स’ गेल्या काही वर्षांत उभारण्यात आले आहेत. आता या पंगतीत शेगाव स्थानकाला सुद्धा स्थान मिळाले आहे. पुढच्या महिन्यात उघडणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये ७० हून अधिक वर्षांची दीर्घ परंपरा असलेली कचोरी नव्या अवतारात चाखायला मिळणार आहे. इथे अस्सल वऱ्हाडी जेवणावर हौशींना ताव मारता येणार आहे. २४ तास सेवा देणाऱ्या या वातानुकूलित रेस्टॉरंटचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे.

( हेही वाचा : नवी मुंबईकरांवर एकाच महिन्यात दोनदा पाणीसंकट!)

कचोरीचा जन्म पाकिस्तानातला

खवय्यांच्या पसंतीला उतरलेल्या या कचोरीची जन्म कहाणी काही दशकांपूर्वी सुरू झाली आहे. भारताच्या फाळणीने या कचोरीला जन्म दिला. ब्रिटीश कालीन भारताच्या विभाजनामुळे पाकिस्तानातले एक गृहस्थ शेगावमध्ये आले. पंजाबमधून आलेल्या या व्यक्तीचे नाव आहे तिरथराम करमचंद शर्मा. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी कचोरी विकण्याचे काम सुरू केले होते. आज त्यांची तिसरी पिढी ‘टी.आर.शर्मा’ या नावाने कचोरीचा व्यवसाय करत आहेत.

( हेही वाचा : स्वस्तात फिरा नेपाळ! IRCTC च्या पॅकेजमध्ये मिळणार अनेक सवलती   )

कचोरीचे शहर

महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा येतो. प्रत्येक जिल्ह्याची स्वत:ची एक विशेष ओळख असते. एखादा जिल्हा आंब्यासाठी प्रसिद्ध असतो, तर एखादा जिल्हा केळ्यांसाठी. लोणारचे सरोवर, जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड यासाठी बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध आहेच. आता या सोबतीला आणखी एक ओळख बुलढाण्याशी जोडली जाण्याची शक्यता आहे. ती ओळख म्हणजे कचोरी.

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.