सोने तस्करीत महिला गॅंग सक्रिय! ९ केनियन महिलांना अटक

255
महिला गॅंग सोने तस्करीत सक्रिय

अंमली पदार्थ तस्करीनंतर सोने तस्करीत परदेशी महिलांची गॅंग मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. अंतरवस्त्रात सोने लपवून भारतात त्याची तस्करी करणाऱ्या १८ सुदानी महिलांना डीआरआयने अटक केल्यानंतर गुरुवारी सीमाशुल्क विभागाने सोने तस्करी प्रकरणी ९ केनियन महिलांना सोने तस्करी प्रकरणी अटक केली आहे. या महिलांकडून सीमाशुल्क विभागाने १८ किलो सोने जप्त केले आहे.

( हेही वाचा : Nitesh Rane: संजय राऊत राजकारणातला लावारीस आहे का?, नितेश राणेंचा सवाल)

महिला गॅंग सक्रिय 

अर्दो नूर, शुक्री फराह, केरो जामा, हबीबा उमर, एब्ला अब्दुलाही, अनाब मुहुमेद, अनीसा मुबारक, इस्निना युसूफ आणि झैनाब मोहमुद अशी अटक करण्यात आलेल्या केनियन नागरिक असलेल्या महिलांची नावे आहे. काही दिवसांपूर्वीच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ सुदानी महिलांना १६ किलो सोन्यासह अटक केली होती.

या कारवाईनंतर विमानतळावरील सीमाशुल्क विभाग सतर्क झाले आहे. गुरुवारी दुपारी सीमा शुल्क विभागाने नैरोबी येथून आलेल्या ९ केनियन महिलांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांच्या सामानाची तपासणी सुरू केली असता या महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःजवळील बॅगा तपासण्यास अधिकाऱ्यांना विरोध केला, मात्र सीमाशुक्ल अधिकाऱ्यांनी या महिलांचे सामान तपासले असता त्यामध्ये महिलांच्या अंतरवस्त्रात १८किलो सोने सापडले. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने या महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलांनी मुंबईत तस्करी करून आणलेले सोने मुंबईत कुठे पोहचवले जाणार होते याचा तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.