Tobacco : पान टपऱ्यांवरील कारवाईमुळे तंबाखूजन्य पदार्थाची चढ्या भावाने विक्री

मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेने सोमवारपासून कारवाईत जवळपास ६०० पान टपऱ्यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून अनेक पानटपरी मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

195
पान टपऱ्यांवर कारवाई
पान टपऱ्यांवर कारवाई

पोलिस आणि महानगर पालिकेकडून मुंबईत सुरू असलेल्या पान टपऱ्यावरील कारवाईमुळे मुंबईतील काही ठिकाणी तंबाखूजन्य Tobacco पदार्थाची विक्री चढ्या भावात करण्यात येत आहे. कारवाईच्या भीतीने अनेक पानटपरी मालकांनी आपली दुकाने बंद ठेवल्यामुळे सहज उपलब्ध होणारे सिगारेट,पान, गुटखा, तसेच तंबाखूजन्य मिळेनासे झाल्यामुळे काही जणांनी काळ्याबाजारात त्याची चढ्या भावाने विक्री सुरू केली आहे.

दरम्यान मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेने सोमवारपासून कारवाईत जवळपास ६०० पान टपऱ्यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ Tobacco जप्त करून अनेक पानटपरी मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पान टपऱ्याचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, महत्वाची ठिकाणे, रेल्वे स्टेशन परिसर, मार्केट परिसर, निर्जनस्थळे, धार्मिक स्थळे, गर्दीची, वर्दळीची ठिकाणे, बगीचे इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिगारेट, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाची Tobacco सर्रासपणे विक्री सुरू आहे. अनेक ठिकाणी अमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सिगारेट, हुक्काची मोठ्या प्रमाणात विक्री करून नवीन पिढीला व्यसनाच्या खाईत लोटले जात आहे. मुंबई पोलिस आणि महानगर पालिकेने मंगळवारपासून या बेकायदेशीर पान टपऱ्यावर धडक कारवाई सुरू करून अनेक अनधिकृत पान टपऱ्या जमीनदोस्त केल्या असून अनेक ठिकाणाहून लाखो रुपये किमतीचा गुटखा, ई सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहे.

(हेही वाचा Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद? राजकीय चर्चांना उधाण! काय म्हणाले संजय राऊत?)

मागील चार दिवसापासून पोलीस आणि मनपा अधिकारी यांनी राबवलेल्या कारवाईत जवळपास ६०० पान टपऱ्यावर कारवाई करण्यात आलेली असून त्यापैकी २५४ पान टपऱ्या Tobacco भुईसपाट करण्यात आलेल्या आहेत. गुटखा, अमली पदार्थ आणि ई सिगारेट विक्री करणाऱ्यावर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईच्या भीतीने मुंबई तसेच उपनगरातील पान, गुटखा विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवले असून अनेक जण चोरून लपून गुटखा, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची चढ्या भावाने विक्री करीत आहे तसेच दुकानदारांनी  देखील सुट्टे सिगारेट, गुटखा, तंबाखूचे भाव वाढवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.