काय सांगता! ‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसामुळे रद्द होणार नाहीत क्रिकेट सामने

187
Advanced Sub Air System
काय सांगता! 'या' तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसामुळे रद्द होणार नाहीत क्रिकेट सामने

कोणत्याही खेळात जेव्हा पावसामुळे व्यत्यय येतो तेव्हा त्या खेळाची रंगत कमी होते. त्यातही जर क्रिकेटच्या सामन्यात पाऊस पडला, तर पुन्हा खेळ सुरू व्हायला वेळ लागतो. तर कधीकधी सामना रद्द केला जातो. या पुढे सामना रद्द करण्याची वेळ येणार नाही. कारण असे एक तंत्रज्ञान विकसित झाले आहे ज्यामुळे आता कितीही पाऊस पडला तरी नो टेन्शन. ही पद्धत नक्की काय हे आपण बघूया.

२० मिनिटांत ओलसर मैदान सुकणार 

आता कितीही जोरदार पाऊस पडला तरी अवघ्या २० मिनिटांत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खेळपट्टीवरील जमलेले पाणी नाहीसे होणार आहे. पाऊस पडल्याने आऊटफिल्डवर परिणाम होतो. हे शक्य होणार आहे ते एडवान्स सब एअर सिस्टमुळे.

एडवान्स सब एअर सिस्टिममुळे पावसानंतर मैदान लवकरात लवकर सुकवण्यात मदत होणार आहे. यामुळे खेळावर परिणाम होणार नाही. याआधी स्टेडियमच्या एका भागात पाणी काढण्यासाठी ड्रेनेज सिस्टमचा वापर करण्यात आला होता. सामने रद्द झाल्याने भविष्यात पुन्हा तसे होऊ नये, यासाठी एडवान्स सब एअर सिस्टिमचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच एचपीसीए अर्थात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. धर्मशाळा स्टेडियममध्ये २ सामने रद्द झालेत. त्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेतला गेला. याचे सर्व काम मार्च महिन्यातच पूर्ण झाले.

(हेही वाचा –  BCCI : बीसीसीआयकडून महिला खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर)

“धर्मशाळा स्टेडियममधील नव्या आऊटफिल्डमधील पावसाचे पाणी काढण्यासाठी एडवान्स सब एअर ड्रेनेज सिस्टम स्थापित करण्यात आले आहे. ज्यामुळे पावसाचे पाणी २० मिनिटात सुकवले जाईल. त्यानंतर मैदानात खेळता येईल”, असे एचपीसीएचे सचिव अवनीश परमार यांनी सांगितले.

गवताच्या मुळातले पाणी खेचणार

सब एअर सिस्टिमच्या मदतीने लवकरात लवकर मैदान सुकवले जाते. या सिस्टीमच्या मदतीने संपूर्ण मैदानात आऊट फिल्डमध्ये परफारेटड पाईप टाकले जातात. यामध्ये बारीक बारीक छिद्र असतात. या छिद्रांच्या मदतीने पाणी या पाईपच्या माध्यमातून बाहेर पडते. तसेच प्रेशरमुळे पाणी शोषून बाहेर काढले जाते. इतकेच नाही, तर या सिस्टमच्या मदतीने मैदानातील गवताच्या मुळातले पाणी एअर प्रेशरच्या मदतीने शोषून काढले जाऊ शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.