रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे विकास आणि रोजगार मिळणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही, अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडली आहे. विकासाच्या बाजूने राष्ट्रवादीची भूमिका आहे. बारसूसंदर्भात राजन साळवींची भूमिका वेगळी आणि राऊतांची भूमिका वेगळी असल्याचेही अजित पवार म्हणाले.
बारसू रिफायनरीविरोधात शुक्रवारी तीव्र स्वरुपात आंदोलन झाल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. बारसू प्रकल्पाला नेमका विरोध कशासाठी होतोय, हे समजून घेतले पाहिजे. जर प्रकल्पामुळे मासेमारी उद्योगावर परिणाम होणार नसेल आणि तरुणांना रोजगार मिळणार असेल तर याबाबींचा विचार केला पाहिजे. या प्रकल्पामुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
(हेही वाचा – Barsu Refinery Project : स्थानिकांच्या संमतीशिवाय बारसू प्रकल्प पुढे नेणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )
पण जर या प्रकल्पामुळे कायमचे नुकसान होणार असेल तर विचार झाला पाहिजे. मात्र उलट प्रकल्पामुळे फायदा होणार असले, आर्थिक सुबत्ता येणार असेल तर याबाबत सकारात्मक विचार केला पाहिजे. प्रकल्पाच्या भागाचे नुकसान होणार नसेल तर विरोध करणाऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. राष्ट्रवादीची भूमिका नेहमी विकासाच्या बाजूची राहिली आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान शुक्रवारी रिफायनरी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणाच्या वेळी स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. असे असूनही पोलिसांनी फौजफाट तैनात करून रिफानगरीविरोधातील आंदोलकाला माती परीक्षण सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. यामुळे आंदोलन आणखी पेटल्याचे दिसले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community