राज्यात सध्या रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. पण आता बारसुतील हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत सरकारसोबत चर्चा केली जाणार आहे.
(हेही वाचा – …तर राष्ट्रवादीचा विरोध नाही; बारसू रिफायनरीसंदर्भात अजित पवारांची भूमिका स्पष्ट)
दरम्यान शुक्रवारी बारसू विरोधातील स्थानिकांचे आंदोलन तीव्र झालेले पाहायला मिळाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. पण विनायक राऊतांसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलकांनी थेट माती परीक्षण सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत पोलिसांचा विरोध जुगारून आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात काही आंदोलकांना दुखापत झाली.
याच पार्श्वभूमीवर माती परीक्षण तीन दिवसांसाठी थांबवा, आम्ही चर्चेला तयार आहोत अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर आता तीन दिवसांसाठी बारसू रिफायनरीच्या विरोधातील आंदोलन स्थगित केले आहे. या स्थगितीदरम्यान सरकारसोबत आंदोलकांची चर्चा होणार आहे. त्यामुळे आता या चर्चेत काय तोडगा निघणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community