Apmc Election Result: जिंतूर बाजार समितीवर भाजपला बहुमत, बोर्डीकर गटाला १४ जागा

253
Apmc Election Result
Apmc Election Result: जिंतूर बाजार समितीवर भाजपला बहुमत, बोर्डीकर गटाला १४ जागा

जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Apmc Election Result) संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने स्पष्ट असे बहुमत प्राप्त केले आहे. या बाजार समितीत बोर्डीकर गटाने १८ पैकी १४ जागांवर पटकावल्या असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले.

शनिवारी, २९ एप्रिलला सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसह त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्रासमोर मोठ्या संख्येने जमा झाले होते. हळूहळू मतमोजणीचा निकाल बाहेर येवू लागला तेव्हा या निवडणुकीत बोर्डीकर गट स्पष्ट बहुमत मिळवेल, असे चित्र निर्माण झाले. त्याप्रमाणेच अंतिम टप्प्यात निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघांतर्गत संचालकांच्या ११ जागा आणि हमाल मापाडी मतदारसंघांतर्गत १, तसेच व्यापारी मतदारसंघांतर्गत २ अशा एकूण १४ संचालकांच्या जागा बोर्डीकर गट हस्तगत केल्या आहेत. तर माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ग्रामपंचायत मतदारसंघांतर्गत ४ जागा पटकावल्या आहेत. (Apmc Election Result)

(हेही वाचा – चांदिवलीत भाजपा शिवसेनेचे सुत जुळेना: आमदारांच्या कारभारामुळे भाजपसह शिवसेनेचे पदाधिकारी त्रस्त)

निवडणुकीचा निकाल (Apmc Election Result)

सहकारी संस्था मतदारसंघात पांडुरंग सोमा आडे ३२५, गंगाधर वामनराव कदम ३३९, रामराव नारायणराव घुगे ३२९, महादेव उर्फ प्रमोद माणिकराव चव्हाण ३२५, सुंदर शंकरराव चव्हाण ३२७, रामभाऊ गोपीचंद जाधव ३२२, कृष्णकांत शिवाजीराव मोरे हे ३२५ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात ५५२ मते वैध तर २४ मते अवैध ठरली. महिला राखीव मतदारसंघातून दुर्गाबाई गंगाधरराव कांगणे यांनी ३४५, रोहिणी रमेशराव ढवळे ३३१ मते मिळवून विजय पटकावला. या मतदारसंघात ५६७ वैध आणि ९ मते बाद ठरली. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून विमलबाई कैलासराव लकडे यांनी ३४१ मते मिळवून विजय पटकावला. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात गजानन हरिभाऊ वर्हाड यांनी ३४५ मते घेवून विजय पटकाविला. (Apmc Election Result)

ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण गटात गणेश सदाशिव इलग ४४४ तर विश्वनाथराव प्रभाकर राठोड यांनी ४३७ मते घेवून विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रामराव अर्जूनराव उबाळे यांनी ४३६ मते घेवून विजय मिळवला. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून मनोज मुंजाभाऊ थिटे हे ४४७ मते घेवून विजयी झाले. व्यापारी मतदारसंघातून रमन गिरधारीलाल तोष्णीवाल यांनी ४१ तर सचिन प्रल्हादराव देवकर यांनी ३६ मते घेवून विजय पटकाविला. हमाल व तोलारी मतदारसंघात नामदेव कठाळू मोहिते यांनी १७ मते मिळवून विजय पटकाविला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव भोसले यांनी दिली. (Apmc Election Result)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.