डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार जणांची हत्या झाल्यानंतर या चारही प्रकरणात तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला त्यात कुठे ताळमेळ दिसत नाही, कुठला तर्क दिसत नाही, या चारही प्रकरणाची चार्जशीट वाचली की, लक्षात येते हा तपास नाही तर विनोद आहे, असे स्पष्ट मत या चारही हत्याकांडावरील तपासातील सावळागोंधळ पुस्तकाच्या माध्यमातून मांडणारे; ‘द रॅशनलिस्ट मडर्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांनी मांडले.
शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मडर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून इतिहासतज्ञ आणि लेखक रतन शारदा आणि विशेष पाहुणे म्हणून अभिनेत्री केतकी चितळे उपस्थित होते. या खटल्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वकील वीरेंद्र इचलकरंजीकर हेही या वेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी डॉ. अमित थडानी यांनी प्रेझेंटेशनद्वारे पुस्तकातील तथ्यांविषयी मनोगत व्यक्त केले.
तपास म्हणजे संभ्रमच
एकदा का एखाद्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाली की, याचा अर्थ पोलिस तपास पूर्ण झाला आणि खटला सुरू होतो. दाभोलकर, पानसरे प्रकरणात तपास यंत्रणांनी चार्जशीट दाखल केल्यावरही पुन्हा पुन्हा नवीन नवीन चार्जशीट दाखल केले, त्यातून वेगवेगळे तर्क मांडले गेले, कधी २ आरोपी सांगितले, कधी त्या व्यतिरिक्त दुसरेच तीन आरोपी समोर आणले गेले, याचा अर्थ गोळ्या मारणारे दोन आरोपी होते आणि ताब्यात घेतलेले ७ आरोपी होते, त्यात दोन पिस्तुले दाखवण्यात आली, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष कुठलेच पिस्तूल नसते, मग त्यातील एक पिस्तूल ठाणे खाडीत टाकल्याचे तपास यंत्रणा दावा करतात ते शोधण्यासाठी कोट्यवधीचा खर्च होतो आणि ६ वर्षांपूर्वी खाडीत टाकलेले पिस्तूल सापडल्याचा दावा तपास यंत्रणा करतात. त्याचे दोन फॉरेन्सिक लॅबचे दोन अहवाल वेगवेगळे येतात, ज्यात एक अहवाल सांगतो ते पिस्तूल या हत्येसाठी वापरलेले नाही, तर एक अहवाल म्हणतो ते तेच पिस्तूल आहे. असा हा सावळागोंधळ दाभोलकर प्रकरणात घडलेला आहे, यात संशयितांची बाजू मांडणाऱ्या वकिलालाही अटक होते, असा अजब प्रकार तपास यंत्रणांनी केला आहे, असाच सावळा गोंधळ पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणातील तपास यंत्रणांनी केला आहे, असेही डॉ. थडानी म्हणाले.
या प्रकरणामध्ये अटक केलेले संशियत गरीब लोक आहेत, ते अतिशय सामान्य लोक आहेत, त्यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरीही त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर दबाव आणून साक्ष वदवून घेतली आहे, असेही डॉ. अमित थडानी म्हणाले.
(हेही वाचा – अखेर मुर्हुत ठरला; ‘या’ दिवशी राम मंदिरात करणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा)
हे पुस्तक प्रश्न विचारण्याची हिंमत देते – वकील इचलकरंजीकर
हे पुस्तक सुरुवात आहे. दाभोलकर, कलबर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश या चार हत्यांच्या तपासात बऱ्याच चुकीच्या बाबी तपास यंत्रणाकडून केल्या आहेत, त्यावर प्रश्न विचारण्याची हिंमत या पुस्तकाचे लेखक यांनी दाखवली आहे, असे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले. खरे तर असे प्रश्न विचारण्याची हिंमत आपण कधी केलीच नव्हती. गोध्रा हत्याकांडचा मास्टरमाईंड आज निर्दोष सुटला आहे, हे कुणाला माहीत नाही, त्याचे नावही कुणाला माहीत नाही, या हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या, त्यात बेस्ट बेकरी प्रकरणात २ हिंदू आरोपींना अटक केली, त्यांना खालच्या न्यायालयाने, उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले पण तिस्ता सेटलवाड या तथाकथित मानवाधिकार कार्यकर्त्याने आकांडतांडव केला आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेल्या, आयोगानेही पहिल्यांदाच स्वतःहून सर्वोच्च न्यायालयात जात य प्रकरणावर सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयानेही तातडीने सुनावणी घेवून खटला पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला तोही मुंबई न्यायालयात चालविण्यास सांगितले. आणि पुन्हा खटला सुरू झाला. त्यात न्या. अभय ठिपसे यांनी हे प्रकरणी पुन्हा चालू ठेवले पुढे हेच न्या. ठिपसे काँग्रेसमध्ये गेले. य प्रकरणातील त्या दोन जणांचा तुरुंगातच मृत्यू झाला. त्यांना जामीन मिळावा म्हणून आम्ही न्यायालयात गेलो पण बेस्ट बेकरी प्रकरण म्हणून न्यायालय कायम आम्हला आता नको ट्रायल सुरू आहे असे सांगत राहिले, पण त्या दरम्यान सुधा भारद्वाज, यांच्यासह भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना जामीन मिळतो, ही शोकांतिका नाही का?, असेही वकील वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community