Bhiwandi Building Collapsed : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले. तसेच दहा ते बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

184
Bhiwandi
Bhiwandi Building Collapsed : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

भिवंडी येथील वलपाडा परिसरातील शनिवार २९ एप्रिल रोजी एक इमारत (Bhiwandi Building Collapsed) अचानक कोसळली. यात इमारतीच्या ढिगार्‍याखाली ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल यांनी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले. तसेच दहा ते बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात असून, त्यांना शोधण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल रात्री उशिरापर्यंत करीत होते.

(हेही वाचा – Fight Between Women : चाळीतील महिलांच्या भांडणात गोळीबार, एका महिलेचा मृत्यू)

मृतांची नावे

या दुर्घटनेत नवनाथ सावंत (३५), ललिता रवी मोहतो (२९) आणि सोना मुकेश कोरी (५) यांचा मृत्य झाला आहे.

पाच लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार २९ एप्रिल रोजी रात्री दुर्घटनास्थळी (Bhiwandi Building Collapsed) जाऊन पाहणी केली. त्यानंतर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही पहा

वाहतूक कोंडीमुळे बचाव कार्याला विलंब

मुंबई : नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगाव टोलनाका येथील खाडीपुलावर दुरुस्तीचे काम सुरु असल्याने तिथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दुर्घटनेनंतर ठाण्याहून भिवंडीच्या (Bhiwandi Building Collapsed) दिशेने निघालेल्या बचाव पथकाला वाहतूक कोंडीमुळे उशीर होत होता. तसेचज बचावकार्य सुरू असताना रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकत होत्या. ही वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. बचावकार्य सुरू असताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगरे हेही उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.