प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे येत्या १ मे २०२३ पासून मध्य रेल्वेने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसच्या रचनेत बदल केला आहे. त्यानुसार आता मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये (Mumbai-Pune Sinhagad Express) द्वितीय श्रेणी चेअर कार कोच (नॉन-एसी) जोडला जाणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला द्वितीय श्रेणीच्या चेअर कार कोच वाढवून, मध्य रेल्वेने आपल्या सर्व प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास कसा करता येईल याचा विचार केला आहे.
(हेही वाचा – Central Railway : रेल्वे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वादावर मध्य रेल्वेने काढला तोडगा)
मध्य रेल्वेने दिलेल्या तपशिलानुसार –
11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक १ मे २०२३ पासून तर; (Mumbai-Pune Sinhagad Express)
11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला पुणे येथून दि. १ मे २०२३ पासून हा अतिरिक्त डब्बा जोडला जाणार आहे.
हेही पहा –
मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेसची सुधारित संरचना :
ट्रेनच्या सुधारित रचनेत (Mumbai-Pune Sinhagad Express) आता १६ डबे असतील, ज्यात एक एसी चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था, एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.
मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेस कडून प्रवाशांना विनंती
मध्य रेल्वेने (Mumbai-Pune Sinhagad Express) सर्व प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कोविड नियमांचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे, जेणेकरून त्यांची स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.
Join Our WhatsApp Community