Brij Bhushan Singh : यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनावरून ‘फोगाट’ भावंडांमध्ये वाद

या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. पी. टी उषा यांनीही साक्षी मलिक, विनेश फोगाटसह रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर टीका केली होती.

209
Brij Bhushan Singh : यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनावरून 'फोगाट' भावंडांमध्ये वाद

भारतीय कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात देशातील ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे दिग्गज कुस्तीपटू यांनी पुन्हा जंतरमंतर येथे आंदोलन सुरु केले असून ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

(हेही वाचा – बापरे! आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी संख्येत २९१ टक्के वाढ)

ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून अहवाल मागवला आहे. ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात आतापर्यंत सात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच एफआयआर दाखल करण्यात येईल.लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी हे आंदोलन सुरु केले आहे.

हेही पहा –

या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. पी. टी उषा यांनीही साक्षी मलिक, विनेश फोगाटसह रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर टीका केली होती. आता विनेश फोगाट यांची बहिण बबिता फोगाट यांनी देखील या आंदोलनाबाबत (Brij Bhushan Singh) ट्वीट केलं होतं. “महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी प्रियंका वड्रा त्यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यासोबत जंतरमंतरवर पोहोचले आहेत. पंरतु, या व्यक्तीने स्वतः महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे, तसंच त्यांनी दलित महिलांविरोधातही वक्तव्य केलं होतं,” असं ट्वीट केलं होतं.

विनेश फोगाट यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “जर पीडित महिला कुस्तीपटूंच्या हक्कासाठी (Brij Bhushan Singh) उभे राहता येत नसेल तर बबिता तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या आंदोलनाला कमजोर करू नका”, असं ट्वीट विनेश फोगाट यांनी केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.