MD Drugs : पुण्यात 1.21 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मध्य प्रदेशातून आलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे.

215
पुण्यात 1.21 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त
पुण्यात 1.21 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त

पुणे शहरातील खराडी परिसरात पोलिसांनी दोघांकडून 1.21 कोटी रुपयांचा मेफेड्रोन MD Drugs जप्त केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल जेंडे यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील रतलाम येथून दोन जण पुण्यात आले होते. त्यांच्याकडून 1.21 कोटी रुपयांचे 108 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मध्य प्रदेशातून आलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी गेल्या एक महिन्यापासून पुण्यात वास्तव्यास होता. लाईव्ह कॉन्सर्टसारख्या ठिकाणी तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच याआधी देखील अशा मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांना ड्रग्ज MD Drugs सापडले आहेत. त्यामुळे आजच्या होणाऱ्या संगीतकार ए.आर. रहमान यांचा लाईव्ह कॉन्सर्ट मधे तर हे ड्रग्स वापरले जाणार होते का या अनुषंगाने देखील पुणे पोलीस तपास करत आहेत.

(हेही वाचा Unseasonal Rain : झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – गिरीश महाजन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.