Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा १ ते ३ मे दरम्यान मालदीव दौरा

मालदीवच्या या दौऱ्यामध्ये तिथे सुरू असलेल्या प्रकल्पस्थळांना देखील संरक्षणमंत्री भेट देणार आहेत आणि तेथील भारतीय समुदायासोबत संवाद साधणार आहेत.

248
Rajnath Singh
Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा १ ते ३ मे दरम्यान मालदीव दौरा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) १ ते ३ मे दरम्यान मालदीवचा दौरा करणार आहेत. या भेटीदरम्यान ते त्यांच्या मालदीवच्या समपदस्थ मारिया अहमद दीदी आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधल्या संरक्षणविषयक संबंधाच्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात येईल. मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलिह यांची देखील संरक्षणमंत्री भेट घेणार आहेत.

(हेही वाचा – Mann Ki Baat 100 : मन की बातच्या माध्यमातून अनेक जनआंदोलनं सुरू झाली – पंतप्रधान मोदी)

या दौऱ्यादरम्यान मित्र देश आणि भागीदार यांच्या क्षमता उभारणी संदर्भात भारताच्या वचनबद्धतेला अनुसरून राजनाथ सिंह मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण (Rajnath Singh) दलांना एक वेगवान गस्ती नौका आणि एक लँडिंग क्राफ्ट भेट देणार आहेत.

मालदीवच्या या दौऱ्यामध्ये तिथे सुरू असलेल्या प्रकल्पस्थळांना देखील संरक्षणमंत्री (Rajnath Singh) भेट देणार आहेत आणि तेथील भारतीय समुदायासोबत संवाद साधणार आहेत. संरक्षणमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे भक्कम बंध निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाची ऐतिहासिक भेट ठरणार आहे.

हेही पहा

भारत (Rajnath Singh) आणि मालदीव सागरी सुरक्षा, दहशतवाद, कट्टरवाद, चाचेगिरी, तस्करी, संघटित गुन्हेगारी आणि नैसर्गिक आपत्तींसह सामाईक आव्हानांना प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी परस्परांच्या घनिष्ठ सहकार्याने काम करत आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात क्षमता उभारणी करण्यासाठी संयुक्तपणे काम करणे हे ‘शेजाऱ्यांना प्राधान्य’ हे भारताचे धोरण त्याचबरोबर मालदीवचे ‘ इंडिया फर्स्ट’ या धोरणासह भारताच्या ‘सागर’ (Security and Growth for All in the Region) या दृष्टीकोनाचा उद्देश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.