Ajit Pawar : लोकसंख्या, पर्यावरणावर अजित पवारांनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे, असेही अजित पवारांनी म्हणाले.

239

विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar अनेकदा सामाजिक विषयावर भावनिक होत असतात. वाढती लोकसंख्या असो अथवा पर्यावरण यावर बोलताना अजित पवार यांनी मांडलेले विचार अनेकांना अंतर्मुख करायला लावतात.

पुण्यातील मावळ येथे विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar बोलताना म्हणाले की, आपल्या देशाचा जगात पहिला क्रमांक लोकसंख्येत आला आहे. त्यात आपण चीनलाही मागे टाकले आहे. हे चीनबीन सगळे पाठीमागे गेले. लोकसंख्येत आपला पहिला क्रमांक आहे. आपण काय करतोय? मलाही वाईट वाटतं. मी ३० वर्षे या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो. १९६९ मध्ये शरद पवार एका मुलीवर थांबले आणि आम्ही आपले वंशाचा दिवा वंशाचा दिवा करत आहोत. वंशाचे दिवे काय करत आहेत हे आपणच आपल्या उघड्या डोळ्याने बघतो आहे. हे गांभीर्याने घ्या. जमीन आहे तेवढीच आहे. पाणी आहे तेवढंच आहे. त्यात पर्यावरणाचा ह्रास होत चालला आहे. मावळकरांना कधी एप्रिलमध्ये पाऊस पाहिला आहे का? आता शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे, असेही अजित पवारांनी Ajit Pawar म्हणाले.

(हेही वाचा Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस विकासामधील अडथळा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.