चेन्नई सुपर किंग्सला २०० धावा करूनही रविवार निराशेचा निघाला. घरच्या मैदानावर चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर पंजाब किंग्सने तोडीसतोड उत्तर दिले. लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम करन यांनी CSKच्या गोलंदाजांना चोपले होते. जितेश शर्माने अफलातून फटकेबाजी करून महेंद्रसिंग धोनीचे टेन्शन वाढवले. तुषार देशपांडेने लिव्हिंगस्टोन व जितेश जरी बाद केले तरी त्याने अखेरच्या ३ षटकार आणि १ चौकार दिल्याने तिथेच चेन्नईच्या हातून सामना निसटला.
शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी PBKS ला अर्धशतकी सलामी दिली. तुषार देशपांडेने पहिला धक्का देताना धवनला ( २८) माघारी पाठवले. प्रभसिमरन चांगली फटकेबाजी करत होता. अथर्व तायडेने मागील सामन्यातील कामगिरीमुळे अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. स्वतःच्याच गोलंदाजीवर रवींद्रने PBKSच्या अथर्वचा (१३) झेल घेतला. तत्पूर्वी, रवींद्रने ९व्या षटकात प्रभसिमरनला ( ४२) यष्टिचीत केले. धोनीने चपळाईने ही स्टम्पिंग केली. सॅम करनने दोन उत्तुंग फटके खेचले, परंतु झेल टिपण्यासाठी CSKचा खेळाडूच तिथे नव्हता. अजिंक्य रहाणेने डाईव्ह मारून एक झेल घेण्याचा प्रयत्न केला. सॅम करन व लिएम लिव्हिंगस्टोन मैदानावर असल्याने CSKचे टेंशन कायम होते. पंजाबच्या या फलंदाजांना सुरुवातीला मोठे फटके खेचताना अडचण येताना दिसली, परंतु १६व्या षटकापासून त्यांनी हात मोकळे करण्यास सुरुवात केली. ३० चेंडूंत ७२ धावा हव्या असताना लिव्हिंग्स्टोने तुषार देशपांडेच्या षटकतात २२ धावा घेतल्या. पथिराणाने १८व्या षटकात ९ धावा देऊन १ विकेट घेतली. १२ चेंडूंत २२ धावा PBKSला करायच्या होत्या. तुषारचा पहिलाच चेंडू जितेशने चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर जितेशने उत्तुंग फटका मारला अन् बदली खेळाडू एसके राशीदने तो टिपला, परंतु त्याचा तोल सीमारेषेजवळ गेला. पाय सीमारेषेला लागणार तितक्यात राशीदने तो मागे घेतला अन् आयपीएल २०२३ मधील हा अविश्वसनीय झेल ठरला. जितेश २१ धावांवर बाद झाला. ६ चेंडू ९ धावा पंजाबला करायच्या होत्या अन् अखेरचं षटक पथिराणा टाकणार होता. पथिराणाने पहिल्या ५ चेंडूंत ६ धावा दिल्या आणि १ चेंडूंत ३ धावा पंजाबला हव्या होत्या. सिंकदरने ३ धावा घेताना थरारक विजय मिळवला. पंजाबने ४ विकेट्सने ही मॅच जिंकली. 2008 नंतर चेपॉकवर चेन्नईचा संघ २०० धावा करूनही प्रथमच हरला.
Join Our WhatsApp Community