एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने Unseasonal rain हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांना मोठे नुकसान झाले. मात्र मे महिन्यातील ५ दिवस पावसाचे असणार आहेत, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याने आता राज्यात पुढील पाच दिवस देखील अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस Unseasonal rain बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईतील काही भागांत रविवारीदेखील हलका पाऊस झाला. दरम्यान, रविवारी रात्री, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला.
(हेही वाचा Unseasonal Rain : झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – गिरीश महाजन)
Join Our WhatsApp Community