IPL 2023 : टीम डेव्हिड घेणार ‘पोलार्ड’ची जागा?

कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमारने आक्रमक खेळी करून धावंसख्येचा आलेख चढता ठेवला.

209
IPL 2023
IPL 2023 : टीम डेव्हिड चालवणार 'पोलार्ड'ची जागा?

आयपीएलचा यंदाचा (IPL 2023) हंगाम मुंबई इंडियन्ससाठी कभी खुशी कभी गम वाला राहिला आहे. रविवार ३० एप्रिल रोजी आयपीएलच्या इतिहासातला १००० वा सामना खेळला गेला. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार आशिष शेलार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Brij Bhushan Singh : यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनावरून ‘फोगाट’ भावंडांमध्ये वाद)

रविवार ३० एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (IPL 2023) आणि राजस्थान रॉयल्स या संघात यपीएलचा ४२ वा सामना वानखेडे मैदानात खेळला गेला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ विकेट्स गमावत २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, या धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने १९.३ षटकात ४ विकेट्स गमावत २१४ धावा करून राजस्थान रॉयल्सविरोधात दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना टीम डेव्हिडने षटकार हॅट्रिक मारली त्यामुळे राजस्थानचा दारूण पराभव झाला.

हेही पहा –

टीम डेव्हिडची करामत

पॉवर हीटिंगच्या (IPL 2023) क्षमतेमुळे मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला मागच्यावर्षी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतले होते. मागच्यावर्षीच या खेळाडूने आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. रविवार ३० एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा टिम डेव्हिडची पॉवर हीटिंगची क्षमता दिसून आली. या कामगिरीमुळे टिम डेव्हिडची कायरन पोलार्ड सोबत तुलना केली जात आहे.

सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा (IPL 2023) फक्त तीन धावांवर असताना संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन २८ धावा करून तंबूत परतला. मात्र कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमारने आक्रमक खेळी करून धावंसख्येचा आलेख चढता ठेवला. ग्रीनने ४४ धावा केल्या तर सूर्यकुमारने २९ चेंडूत ५५ धावा कुटल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडने मैदानात धावांचा पाऊस पाडला. डेव्हिडने १४ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. तर तिलक वर्माने २९ धावा केल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.