Jijamata Udyan : आता राणीच्या बागेत येणार नवे पाहुणे, होणार जागेचा विस्तार

ही बाग कायमच पर्यटकांच्या (Jijamata Udyan) आकर्षणचा केंद्रबिंदू असते.

284
Jijamata Udyan
Jijamata Udyan : आता राणीच्या बागेत येणार नवे पाहुणे, होणार जागेचा विस्तार

सध्या मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे पालक आपल्या मुलांना घेऊन बाहेर फिरायला जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारे मुंबईतले एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे राणीची बाग. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Jijamata Udyan) आणि प्राणीसंग्रहालयाला अनेक जण आवर्जून भेट देतात.

(हेही वाचा – LPG Gas Price : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल, घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर)

वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या हत्तीची आंघोळ असेल किंवा वाघाचे तलावात डुंबणे असेल.. ही बाग कायमच पर्यटकांच्या (Jijamata Udyan) आकर्षणचा केंद्रबिंदू असते. १८६१ ला स्थापन झालेल्या या बागेत आता आणखी प्राण्यांची भर पडणार आहेत.

भेटीला येणार हे प्राणी

– जिराफ
– झेब्रा
– चिंम्पाझी
– बिबट्या
– पाणघोडा
– कांगारू
– चित्ता
– पांढरा सिंह
– शहामृग

हेही पहा

२८० कोटींचा खर्च

४५० हून अधिक पक्षी असलेल्या या उद्यानाचा लवकरच विस्तार होणार आहे. मफतलाल मिल आणि पोद्दार मिलच्या ५४ हजार ५६८ चौरसमीटरच्या जागेत या उद्यानाचा विस्तार होणार आहे. या जागेत आणखी एक नवीन प्राणीसंग्रहालय उभे केले जाणार आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरूवात होणार आहे. या कामासाठी साधारणपणे २८० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. (Jijamata Udyan)

अंडरवॉटर प्रदर्शन

या विशेष प्रदर्शनामुळे पर्यटकांना मगर, सुसर या उभयचर प्राण्यांना पाहाता येणार आहे. मगरीसाठी बारा मीटर लांब तर सुसरीसाठी दहा मीटर लांबीच्या हौदाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला उद्यानात ५ मगरी आणि २ सुसरी आहेत. या प्रदर्शनासाठी परराज्यांतून पाच मगरी आणि पाच सुसरी मागवण्यात येणार आहेत. दोन आठवड्यात हे प्रदर्शन खुले होण्याची शक्यता आहे. (Jijamata Udyan)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.