रस्त्यावर छोट्या मोठ्या वस्तूची विक्री करतांना त्याने एमडी या अमली पदार्थाची विक्री सुरू केली होती. हळूहळू त्याने अमली पदार्थाच्या धंद्यांत चांगलाच जम बसवला आणि अवघ्या ४ वर्षात तो ठाणे जिल्ह्यातील अमली पदार्थांचा पुरवठादार बनला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी भिवंडी येथे केलेल्या कारवाईत आयजीएन अन्सारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. एनसीबीने त्याच्या जवळून २ किलो मफेड्रोन या अमली पदार्थांसह ३६ लाख रुपयांची रोकड आणि १४७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला ठाणे जिल्ह्यातील एका बड्या ड्रग्स सिंडिकेटची माहिती मिळाली होती. तसेच या सिंडिकेटचा एक भाग असणारा आयजीएन अन्सारी हा मुंबईतील ड्रग्स माफियाच्या माध्यमातून ड्रग्स पुरवठा करीत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने अन्सारी याच्यावर पाळत ठेवली असता अन्सारी हा मुंबईतील एका ड्रग्स माफियाच्या माध्यमातून ड्रग्सचा मोठा पुरवठा करणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांना होती.
(हेही वाचा – MD Drugs : पुण्यात 1.21 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त)
दरम्यान रविवारी ड्रग्सची (अमली पदार्थ) ची खेप घेण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळताच एनसीबीच्या अधिकाऱ्यानी भिवंडी परिसरात सापळा रचला, आणि ड्रग्सची खेप घेण्यासाठी येणाऱ्या पीएस वीर आणि रोहन के या दोघांना एनसीबीने ताब्यात घेतले. या दोघांजवळून एनसीबीने २ किलो मफेड्रोन (म्याव म्याव) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या दोघांकडे केलेल्या चौकशीत हा अमली पदार्थ अन्सारी याला देण्यात येणार होता अशी माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने अन्सारी याच्या भिवंडीतील घरावर छापा टाकून अन्सारी याला अटक केली. त्याच्या घरातून ३६ लाख रुपयांची रोकड आणि १४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अन्सारी याच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम आणि दागिने अमली पदार्थ विक्रीतून आली असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
४ ते ५ वर्षांपूर्वी अन्सारी हा भिवंडी शहरात रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करीत होता, त्यानंतर त्याने भिवंडीत किरकोळ अमली पदार्थ विक्री सुरू केली, आणि हळूहळू तो ठाणे जिल्ह्यातील मोठा ड्रग्स पुरवठादार बनला अशी माहिती एनसीबीने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community