महाराष्ट्र आणि गुजरातची जन्म तारिख एकच, वेळ एकच, मात्र कुंडली वेगवेगळी असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना केली. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रकल्पावर बोलत असताना आदित्य ठाकरेंनी यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील कुंडलीचा फरक सांगितला.
(हेही वाचा – बारसू रिफायनरी प्रकल्प: सरकारची पवारांशी चर्चा, उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष)
आदित्य ठाकरे नक्की काय म्हणाले?
महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा ही मुंबईतील बीकेसी मैदानावर झाली. या सभेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘गुजरात आणि महाराष्ट्र एकाच दिवशी संघटीत झाले आहेत. १ मे गुजरातचा पण स्थापना दिवस आणि महाराष्ट्राचाही स्थापना दिवस. जेवढ्या मी महाराष्ट्राला शुभेच्छा देता, तेवढ्या गुजरातला ही देतो. पण इथे कोणी ज्योतिष बसलं असेल त्यांनी मला सांगावं, नक्की आपल्या दोघांच्या कुंडलीत काय फरक आहेत? तुम्ही गुजरातचं नशीब बघा आता कसं चाललंय. केंद्र सरकारचे जे काही पाठबळ गुजरातला मिळायचं आहे, ते मिळतंय की नाही? मिळतंय ना. महाराष्ट्राला मिळतंय तेवढ? जन्म तारिख एकच, वेळ एकच, मात्र कुंडली वेगवेगळी. अच्छा ते तरी सोडा. आज नशीब बघा, या घटनाबाह्य सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत, ते तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटतात का? मला तर असं वाटायला लागलंय आजच्या दिवशी गुजरातकडे दोन मुख्यमंत्री आहेत, तिकडंचे खरे मुख्यमंत्री आणि एक आपल्याकडचे बसलेले मुख्यमंत्री. आपल्याकडे मुख्यमंत्री नसल्यासारखा कारभार सुरू आहे. या अंधारातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि ही वज्रमूठ एकत्र करून आपल्याला पुढे निघायचं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community