केरळ स्टोअरीची दुसरी बाजू; पुण्याच्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ते दहशवादी प्रशिक्षण

261
chatroom to pakistan how a love affair landed pune student in jail
केरळ स्टोअरीची दुसरी बाजू; पुण्याच्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ते दहशवादी प्रशिक्षण

भारत विरोधी कारस्थाने रचण्यात पाकिस्तान कधीही थकत नाही. दुटप्पीपणाचा कळस म्हणजे पाकिस्तान. स्वार्थांधतेचा आदर्श म्हणजे पाकिस्तान. निलाजरेपणाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण पाकिस्तान. गोड शब्द पाजून गळा घोटण्याचा किळसवाणा प्रकार काही वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आला. घटना आहे पुण्यातल्या एक तरुणाची. हा तरुण जन्माने भारतीय आहे, मुळचा झारखंडचा. त्याची इतक्या शिताफिने फसवणूक करण्यात आली की त्या तरुणाला हे कळलच नाही की भारताच्या ध्वजाला सलाम करणारे हात कधी देशाचा गळा घोटायला तयार झाले.

नेमकी घटना काय?

गोष्ट सुरू होते २०००च्या दशकात. परराज्यांतून उच्चशिक्षणासाठी पुण्यात आलेला एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणजे विशाल. २००५ ला त्याने तेव्हाच्या प्रसिद्ध सोशल मीडिया साईट असलेल्या चॅटरूमवर अकाऊंट बनवले. या चॅटरूममध्ये त्याची त्या व्यक्तिशी ओळख झाली जिच्यामुळे त्याचा पुणे ते पाकिस्तान, पाकिस्तान ते तुरूंग असा प्रवास होणार होता. बिनबुडाच्या आश्वासनांनी, निरर्थक स्वप्नांनी आणि शारीरिक सुंदरतेने विशालला भुरळ घालणारी फातिमा नामक युवती त्याला इथे भेटली. त्यांनी चॅटरूमवर बोलायला सुरुवातीला केली. तिथून पुढे फातिमाने तिचा पाकिस्तानातला नंबर विशालला दिला. हडपसर विभागातल्या एका एसटीडी बूथ वरून विशाल तिला कॉल करायचा. त्याच्या या संभाषणाचे बिल तब्बल दीड लाख रूपये आले होते.

धर्म की फातिमा?

इतर प्रेमी युगूलांप्रमाणे फातिमा आणि विशालचे संभाषण असते तर त्यासाठी विशालला सात वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली नसती. फोनवर फक्त ते दोघेच एकमेकांसोबत बोलत नव्हते. विशालने त्याच्या कुटुंबियांची संपूर्ण सत्य माहिती फातिमाला सांगितली होती. तिने सुद्धा तेच केले. तिने विशालला सांगितले की, तिच्या वडिलांनी पाकिस्तानी सैन्यदलात काम केले आहे. जेव्हा विशालने फोनवर फातिमाच्या वडिलांसमोर लग्नाचा विषय काढला तेव्हा त्यांनी ठरल्याप्रमाणे त्याला उत्तर दिले. त्यांनी विशालला धर्मांतराची अट मान्य करायला लावली. प्रेमाखातर त्याने ही अट स्वीकारली.

…मग विशालचा आला आयएसआयशीसंबंध 

फातिमाच्या कुटुंबियांनी विशालला पाकिस्तानात बोलावले. ऑक्टोबर २००६ मध्ये चार दिवसांसाठी तर जानेवारी २००७ मध्ये चौदा दिवसांसाठी विशाल पाकिस्तानात गेला. कराचीतल्या या मुक्कामात फातिमाचे वडील त्याला एका गुप्त ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्याला रितसरपणे दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले. पाकिस्तानातल्या आयएसआय या गुप्तेहेर संघटनेशी संबंधित असलेल्या फातिमाच्या वडिलांनी त्याला आश्वासन दिले की, ते दोघे लंडनमध्ये स्थायिक होऊ शकतील. फक्त हे करण्यासाठी त्याने पुण्यातील लष्कराच्या संस्था व इतर धार्मिक, संवेदनशील ठिकाणांची माहिती पाठवली पाहिजे.

कबूल कबूल कबूल?

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी विशालने सगळं काही केले. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणांचे फोटो, महत्त्वाची माहिती त्याने मिळवली. विशाल ही माहिती पाकिस्तानात पाठवणार तितक्यात पुण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केली. या गुन्ह्यात फातिमा, तिचे वडील सलाहुद्दीन यांना षड्यंत्रकारी आरोपी म्हणून घोषित करण्यात करण्यात आले. व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतल्या ज्या अधिकाऱ्यांनी विशालला मदत केली होती, त्या पाकिस्तान हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांना आरोपी ठरवण्यात आले. जेव्हा विशालला न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा त्याने आरोप फेटाळले. मार्च २०११ मध्ये न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी विशालला भारतीय दंड संविधान कलम १२० ब तसेच ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवून ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.