रत्नागिरीतील बारसू रिफायनगरींच्या मुद्द्यावरून शिंदे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा करत आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून शरद पवारांशी रिफायनगरींच्या मुद्द्यावरून चर्चा केली. तसेच सोमवारी, १ मेला दुपारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता शरद पवारांचा सल्ला का? म्हणत शिंदे सरकारला सवाल केला. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अमित शाह यांनाही इशारा दिला.
नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सोमवारी, महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा ही मुंबईतील बीकेसी मैदानावर झाली. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बारसूमध्ये सुद्धा माझ्या नावाने पत्र दाखवतायत, उद्धव ठाकरेंनीच ही जागा सुचवली होती. हो सुचवली होती. आपल्या सरकारने सुचवली होती. पण त्या पत्रामध्ये असं कुठे लिहिलंय का? पोलिसांना घुसवा, लाठ्या चालवा, अश्रू धुरांच्या नळकांट्या फोडा, गोळ्या चालवा पण वेळे प्रसंगी रिफायनगरी करा, असं माझ्या पत्रात लिहिलंय आज आपण तिघंही एकत्र आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा हे बोंब काय मारत होते? की हे म्हणजे मी पवार साहेबांच्या अंमला खाली गेलो. राष्ट्रवादी दादागिरी करतंय. पण आज उदय सामंत पवारसाहेंबांना भेटून आले आहेत. तुम्ही गेला तर चालतं. तुम्ही करालं ते वाटेल ते. पण उद्धव ठाकरेंनी करायचं नाही.’
(हेही वाचा – महाराष्ट्र आणि गुजरातची जन्म तारिख एकच, मात्र कुंडली वेगवेगळी – आदित्य ठाकरे)
‘शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली होती, तेव्हा तुमचा ठांगपत्ताही नव्हता. आज हे शेफारलेली लोकं आहेत, हे मला बाळासाहेब शिकवतायत. त्यांना मला सांगायचं आहे, अनेक जण तुम्ही बाळासाहेबांना भेटलाही नव्हता. पण स्वतः शरद पवार साहेबांकडे गेले काय करू? काय करू?. मग का सल्ला घ्यायला जाता तुम्ही. का विचारपूस करायला जाता तुम्ही. बरं बारसूचं पत्र मी दिलं होत आणि तुम्ही बारसू बारसू करत स्वतः बारसं करून घेत असालं, तर पालघरमध्ये आदिवासींच्या घरात पोलीस का घुसवले,’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला.
अमित शाहांना काय दिला इशारा?
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचं वस्त्रहरण थांबवण्यासाठी वज्रमूठचा एकच ठोसा असा मारा की, पहिला महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या, नाहीतर लोकसभेसोबत तिन्ही निवडणुका घ्या, तुम्हाला आम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. आणि अमित शाहांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते, तो माझ्या महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community