सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० ते ५ यावेळेत लोकदरबार भारावला जाणार आहे. तसेच अन्य विभागांच्या तक्रारींचेही या लोकदरबारात निवारण करण्यात येईल अशी घोषणा पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी सोमवार १ मे रोजी केली.
(हेही वाचा – राऊत आणि पवारांची कट्टी)
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावेळी लोढा (Mangalprabhat Lodha) बोलत होते. या वेळी जिल्हा क्रीडा पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. गुणवंत पुरूष खेळाडू हा पुरस्कार अक्षय तरळ यांना तर गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार रूपाली सुनील गंगावाणे यांना प्रदान करण्यात आला. तर अनिल तुळशीराम थोरात यांची गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.
हेही पहा –
याशिवाय महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ बृहन्मुंबई व ठाणे यांच्याकडून मंडळातील सुरक्षा पर्यवेक्षक राजेश व्ही. सावंत, सुरक्षारक्षक संदीप भेलकर, आर वी नायर आणि साहाय्यक सुरक्षा आधिकारी व्ही वनकर यांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. (Mangalprabhat Lodha)
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community