Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तास बंद राहणार

325
Mumbai International Airport
Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तास बंद राहणार

मंगळवार २ मे २०२३ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विमानतळ बंद (Mumbai International Airport) राहणार आहे. हवाई दलाकडून विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे. विमानतळावरील दोन्ही धावपट्टी (०९/२७ आणि १४/ ३२) या धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामासाठी विमानतळ सहा तास बंद ठेवले जाणार आहे.

(हेही वाचा – बापरे! आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी संख्येत २९१ टक्के वाढ)

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा नंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) हे जगातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात व्यस्त सिंगल रनवे एअरपोर्ट आहे. दिवसभरात या विमानतळावरून ९०० विमानांचे उड्डाण होते. अशा परिस्थित विमानतळ सहा तासांसाठी बंद असणे हे एक मोठी गोष्ट आहे. मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे विमानतळावर सगळ्या सुखसोयी पुरवणे गरजेचे आहे.

हेही पहा

मुंबई विमानतळाने प्रवाशांचे गैरसोय होऊ नये म्हणून विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांसह धावपट्टी देखभालीच्या कामाचे नियोजन केले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार नियोजन करण्यास मदत झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.