मुंबई पासून थोड्याच अंतरावर असलेल्या विरार जवळील राजोडी बीच येथे असणाऱ्या एका फार्महाऊसमध्ये जवळच्या एका उपहार गृहामधून दररोज पहाटे ३ ते ४ वाजता ५० ते ५५ माणसांसाठी चहा नाश्ता जात होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाश्ता तो देखील पहाटे पहाटे जात असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्यातील एका अधिकारी यांना मिळाली,आणि त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि धक्कादायक प्रकार समोर आला. (Call Centre)
(हेही वाचा – Apple पाठोपाठ ‘ही’ कंपनीसुद्धा भारतात स्टोअर्स सुरू करण्याच्या तयारीत)
विरारच्या राजोडी बीच जवळील मयूर कुटीर फार्म हाऊस जवळ असणाऱ्या मयूर पाटोळे यांच्या फार्महाऊसमध्ये मागील एक महिन्यापासून जवळच्या एका उपहारगृहात ५० ते ५५ माणसासाठी चहा नाश्ताची ऑर्डर दिली जात होती. ही ऑर्डर केवळ पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान दिली जात होती, अशी माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अमर पाटील यांना मिळाली होती. एवढ्या पहाटे कोण नाश्ता मागवतो ते देखील मोठ्या प्रमाणात असा प्रश्न पाटील यांना पडल्यावर त्यांनी या फार्महाऊसवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. या फार्महाऊसमध्ये काही तरी संशयास्पद हालचाली सुरू असून कुठले तरी मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा संशयावरून पाटील यांनी पोलीस पथकाला गुप्तपणे पाळत ठेवून फार्महाऊसची माहिती काढण्यास सांगितले. (Call Centre)
हेही पहा –
आम्हाला हे देखील आढळले की फार्महाऊस आणि तेथील वस्तीगृह ५० वर्षाचे मयूर पाटोळे यांचे आहे, त्यामुळे आम्हाला आणखी संशय आला,” त्यांचे कारण म्हणजे पाटोळे यांनी तीच जागा २०२१मध्ये नायजेरियन ड्रग्ज तस्करांना भाड्याने दिली होती, या नायजेरियनला अटक करण्यात आली होती अशी माहिती पाटील यांनी दिली. पुढील एक आठवडा पाटील आणि त्यांच्या पथकाने फार्महाऊसवर पाळत ठेवली असता फार्महाऊसमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळून आले. (Call Centre)
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहाटे ३ वाजता अर्नाळा पोलिसांच्या २० जणांच्या पथकांनी फार्महाऊसवर छापा टाकून २७ पुरुष आणि २० महिला, त्यात पाच पर्यवेक्षक, चार टीम लीडर, एक समन्वयक आणि स्वतः मयूर पाटोळे अशा एकूण ४७ जणांना अटक करण्यात आली. पाटील यांनी सांगितले की, “आम्ही आत प्रवेश करताच, आम्हाला ५० टेबल्स सेट केलेले आणि प्रत्येक टेबलवर लँडलाइन कनेक्शनसह एक संगणक दिसला. आम्ही आत शिरलो तेव्हा काम चालू होते आणि फोन कॉल्सच्या मध्येच आम्ही अनेक कर्मचाऱ्यांना पकडले,” पाटील पुढे म्हणाले. “संयोजक किंवा पटोले यांच्याकडे कॉल सेंटरसाठी दिल्लीतील एका व्यक्तीने स्वाक्षरी केलेल्या सहा महिन्यांच्या भाडे करारा शिवाय कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती.” (Call Centre)
पोलिसांनी परिसराची झडती घेतली असता २० लाख रोख रक्कम मिळुन आली, ती रक्कम कर्मचारी आणि इतर खर्चासाठी , वापरली जात होती. या ठिकाणी गेल्या २५ दिवसांपासून कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरची माहिती बाहेर कोणाला कळू नये म्हणून कर्मचार्यांना बाहेर जाण्याची किंवा बाहेर कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती,” वसई-विरारचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले. बेकायदेशीर कॉल सेंटर हे जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे सहा महिन्याच्या आत येथील बोजा बिस्तरा उचलून दुसरीकडे जायचे अशी योजना या बेकायदेशीर कॉल सेंटर चालविणाऱ्याची होती. (Call Centre)
अटक करण्यात आलेल्यापैकी मयूर पाटोळे वगळता इतर सर्व दिल्ली, हरियाणा आणि गुरुग्राम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली, त्यांची चौकशी केल्यानंतर आणि बनावट कॉल सेंटरची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट मोठे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे रॅकेट अनेक देशांमध्ये चालवले जात असल्याचा संशय असून अटक करण्यात आलेले सर्वजण केवळ कर्मचारी असून या कॉल सेंटरला आर्थिक मदत यूके आणि यूएस मधून केली जात आहे. तसेच या कॉल सेन्टरमधून ऑस्ट्रेलियन नागरिकांना लक्ष केले जात होते, त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर आली. कॉल सेंटरच्या केवळ कर्मचारी आणि व्यवस्थापकांना अटक करण्यात आली असली तरी, दिल्ली आणि हरियाणामध्ये ज्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणची माहिती अर्नाळा पोलिसांच्या हाती लागली आहे. दिल्ली आणि हरियाणामधील मनुष्यबळ पुरवणाऱ्या दलालामार्फत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यात आले होते. कर्मचार्यांना ऑस्ट्रेलियन भाषेचे विस्तृत प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार करून देण्यात आली होती. (Call Centre)
या कर्मचाऱ्यांना जेवण आणि राहण्याच्या सोयीसह २० हजार रुपये महिना पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यानंतर महिला आणि पुरुषांना विरारला आणून मयूर कुटीरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यांना बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे कॉल सेंटर पहाटे ३ ते ४ या वेळेत सुरू होते. “कर्मचार्यांनी चौकशीत पोलिसांना सांगितले की त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या उच्च माध्यमिक परीक्षा पूर्ण केल्या आहेत आणि जेव्हा ते कामासाठी एजन्सीकडे गेले तेव्हा ते बेरोजगार होते. (Call Centre)
Join Our WhatsApp Community