राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मंगळवारी, २ मेला त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली. ‘मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार’ असल्याचे शरद पवारांनी यांनी जाहीर केले. ‘लोक माझे सांगाती राजकीय आत्मकथा’ या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवारांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. याबाबत कोणतीही पुर्वकल्पना नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला. त्यांनी यावेळी शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद घातली. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीची समिती निवृत्ती निर्णयाबाबत जे काही ठरवले ते मला मान्य असल्याचा निरोप शरद पवारांनी अजित पवारांना दिला. त्यानुसार अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र तरीही अनेक राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांना हे मान्य नव्हते. सध्या याच मुद्द्यावरून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र यावेळी अजित पवारांचा वेगळा सूर असल्याचे दिसले आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीला ‘यांनी’ दर्शवला विरोध
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, विद्या चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहर झिरवळ आणि सुनील तटकरे या नेत्यांनी शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध करत राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा सूर वेगळा दिसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवा अध्यक्ष चालेल अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community