राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, २ मेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याची घोषणा केली. तसेच भविष्यात निवडणूक न लढण्याचे देखील त्यांनी जाहीर केले. दरम्यान पवारांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनधरणी करत एकच गोंधळ केला. यावर सध्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, हा पवारसाहेबांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक निर्णय किंवा प्रश्न आहे. आताच्या स्थितीला यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. शेवटी पवारसाहेबही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये बरंच मंथन चाललं आहे. त्यामुळे एकदा नेमकी परिस्थिती काय आहे? ही परिस्थिती आल्यानंतर त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल.
(हेही वाचा – Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निवृत्तीला कोणाचा विरोध आणि कोणाचे समर्थन)
शपथविधीबाबत काही कल्पना नव्हती, असे शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती राजकीय आत्मकथा’या पुस्तकात लिहिले आहे. यावर फडणवीस म्हणाले की, पवारसाहेबांचे पुस्तक मी वाचलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर आता मी बोलणार नाही. पण मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते मी योग्यवेळी लिहिणार आहे. त्यामुळे नेमके त्यांनी काय म्हटलेय? नेमके मला काय वाटतेय? नेमके सत्य काय आहे? अशा ज्या अनेक गोष्टी आहेत, ज्यावेळेस मी पुस्तक लिहिण, त्यातून तुम्हाला निश्चित कळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community