Congress : पृथ्वीराज चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत धक्कादायक वक्तव्य; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

184
पृथ्वीराज चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत धक्कादायक वक्तव्य
पृथ्वीराज चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत धक्कादायक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरु आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहित नाही. कर्नाटकातही राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे Congress नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार असून, यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, यातच काँग्रेसचे Congress ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी येथील एका प्रचारसभेत बोलताना मोठे विधान केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी किती दिवस काँग्रेससोबत राहील हे माहीत नाही काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. अशातच राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात Congress उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे. रोज बातम्या येतात, कोणता नेता जाणार आणि कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांचे ते बघतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल यासाठी मतांची टक्केवरी वाढवण्याकरता ते निवडणूक लढत आहेत. परंतु भाजपची टक्केवारी वेगळी आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

(हेही वाचा Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या २ राजकीय गौप्यस्फोटाच्या घोषणेची चर्चा; एक पवारांचा राजीनामा, दुसरा?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.