जगभरात एआयची भूमिका जस-जशी वाढू लागली आहे, तस-तसे त्याचे धोकेही समोर येऊ लागले आहेत आणि तज्ज्ञ मंडळींनीही यासंदर्भात उघडपणे बोलायलाही सुरुवात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स Artificial intelligence चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी गेल्या आठवड्यात गुगलचा राजीनामा दिला. यासंदर्भात त्यांनी स्वतःच पुष्टी केली आहे. हिंटन यांनी एआयच्या धोक्यांसंदर्भात माहिती देण्यासाठीच आपली नोकरी सोडली आहे. महत्वाचे म्हणजे, AI विकसित करण्यात हिंटन यांनीही मदत केली होती.
In the NYT today, Cade Metz implies that I left Google so that I could criticize Google. Actually, I left so that I could talk about the dangers of AI without considering how this impacts Google. Google has acted very responsibly.
— Geoffrey Hinton (@geoffreyhinton) May 1, 2023
न्यूयॉर्क टाइम्ससोबत बोलताना, आपल्या गूगलच्या राजीनाम्याची घोषणा करताना हिंटन म्हणाले, मला आता माझ्या कामावर पश्चाताप होत आहे. हिंटन यांनी ट्विट केले की, Artificial intelligence च्या धोक्यांसंदर्भात उघडपणे बोलण्यासाठी आपण गुगलची नोकरी सोडली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, मला AI च्या धोक्यासंदर्भात बोलता यावे आणि याचा गूगलवरही काही परिणाम होऊ नये, म्हणून मी नोकरी सोडली आहे. गूगलने फार जबाबदारीने काम घेतले आहे. आता मी उघडपणे बोलू शकतो. नुकतेच बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना हिंटन म्हणाले, आता मी मला दिसणाऱ्या याच्या धोक्यांसंदर्भात उघडपणे बोलू शकतो. कारण यांपैकी काही धोके अत्यंत भयभीत करणारे आहे. ते म्हणाले, सध्या तरी मी सांगू शकतो की, ते आपल्या पेक्षा अधिक बुद्धिमान नाहीत. पण मला वाटते की, ते लवकरच होऊ शकतात.
Join Our WhatsApp Community