BMC : महापालिकेतील सुमारे १० कार्यकारी अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्ताव रोखले कोणी

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार उपप्रमुख अभियंता पदावर बढती दिली जाते.

314

मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदावरील अधिकाऱ्यांना उपप्रमुख अभियंता पदावर बढती देण्याचे प्रस्ताव मागील काही दिवसांपासून या मंजुरीच्या फाईल महापालिका BMC आयुक्त कार्यालयातच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे दहा पेक्षा अधिक कार्यकारी अभियंते हे उपप्रमुख अभियंता पदाच्या बढतीच्या प्रतीक्षेत असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर या अधिकाऱ्यांना बढतीचे पत्र दिले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार उपप्रमुख अभियंता पदावर बढती दिली जाते. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या सुमारे दहा कार्यकारी अभियंता पदावरील अभियंत्यांच्या बढतीच्या प्रस्तावांवर प्रमोशन कमिटीच्या मंजुरीनंतर अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्वाक्षरी करत पुढील कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात पुढील स्वाक्षरीकरता पाठवण्यात आले होते. परंतु दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही आयुक्तांच्या कार्यालयातून यावर स्वाक्षरी झाली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराजी पसरली आहे. BMC आयुक्त कार्यालयांमध्ये खुद्द आयुक्तांना या फाईलवर स्वाक्षरी करायला वेळ नाही की जाणीवपूर्वक ही मंजुरी लांबवली जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा महापालिकेचे डॉ. संजीव कुमार यांची बदली; श्रवण हर्डीकर नवे अतिरिक्त आयुक्त)

विनोद चिठोरे यांची उपायुक्तपदी बढती

महापालिकेच्या BMC विकास नियोजन विभागाचे दिर्घकाळ प्रमुख अभियंता असलेल्या आणि सध्या दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता असलेल्या विनोद चिठोरे यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली. उपायुक्त (अभियांत्रिकी)या पदावर त्यांची तदर्थ तत्वावर बढती देण्यात आली आहे. २ मे २०२३पासून त्यांची उपायुक्त (अभियांत्रिकी गट) या संवर्गातील पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.