Coastal Road : कोस्टल प्रकल्पाचे असेही छायाचित्र प्रदर्शन

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतून हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी (Coastal Road) खुले करण्यात आले आहे.

300
Coastal Road : कोस्टल प्रकल्पाचे असेही छायाचित्र प्रदर्शन

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) Coastal Road प्रकल्पाचे छायाचित्र प्रदर्शन एनसीपीए मध्ये भरवण्यात आले असून त्या प्रकल्पाची वेगवेगळी आणि कलात्मक छायाचित्रे दिलीप पिरामल आर्ट्स गॅलरीमधील स्क्रीनवर चित्रफीतच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. त्यामुळे वेगवेगळे वळणे रस्ते एकमेकांना कसे मिळतील, भुयारी मार्ग कसा असणार, फिरण्यासाठी मोकळी जागा कुठे असणार, याचीही माहिती चित्रफितीतून देण्यात येत आहे.

(हेही वाचा – मालाड स्टेशनजवळील दुकाने तोडली; पण चार दिवसांनंतरही डेब्रीज तिथेच, रस्ता वाहतुकीसाठी बंद)

मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर आधारित ‘किनारीमार्गाची भ्रमणगाथा’ (Coastal Road) हे छायाचित्र प्रदर्शन नरिमन पॉइंट स्थित नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) च्या सहकार्याने, एनसीपीए मधील दिलीप पिरामल आर्ट्स गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते मंगळवार २ मे २०२३ रोजी सायंकाळी झाले.

हेही पहा

याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘एनसीपीए’चे चेअरमन के. एन. संतूक, ख्यातनाम उद्योजअजीत गुलाबचंद तसेच दिलीप पिरामल, राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महानगरपालिकेचे सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता) स्वामी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.(Coastal Road)

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर किनारी मार्गाची (Coastal Road) संकल्पना तसेच सद्यस्थितीतील प्रगती दर्शवणारी चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी प्रमुख पाहुण्यांना किनारी मार्गाबाबत संक्षिप्त माहिती दिली.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतून हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी (Coastal Road) खुले करण्यात आले आहे. दिनांक ३ मे ते रविवार २१ मे २०२३ या कालावधीदरम्यान, दररोज दुपारी १२ ते रात्री ८ यावेळेत हे प्रदर्शन पाहता येईल.

डोळयांचे पारणे फेरणारे छायाचित्र प्रदर्शन-

या प्रदर्शनात मुंबई किनारी रस्त्याची बांधणी आता कोणत्या टप्प्यावर आहे, भविष्यात हा प्रकल्प कसा दिसणार, अशा विविध टप्प्यांचे विलोभनीय दर्शन वेगवेगळ्या छायाचित्रातून घडविण्यात आले आहे. आजपर्यंतच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील विविध प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत बांधकाम, भव्यदिव्य यंत्रसामुग्री तसेच महत्त्वपूर्ण घटनांची साक्ष देणारी वेगवेगळी छायाचित्रं प्रदर्शित करण्यात आली आहेत. (Coastal Road)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.