ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करण्यात आला आहे. वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात एका तरुणीने त्यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. पीडित तरुणी ही युवा सेनेची पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा – BMC : महापालिकेतील सुमारे १० कार्यकारी अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्ताव रोखले कोणी)
वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Rape Case) राहणारी पीडित तरुणी ही एमबीए ची विद्यार्थीनी असून युवा सेनेच्या पदावर कार्यरत आहे. मंगेश सातमकर हे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक होते.
पीडित युवती राहत असलेल्या ठिकाणी स्थानिक नगरसेवकाच्या ओळखीने या तरुणींची मंगेश सातमकर यांच्या सोबत ओळख झाली होती. सातमकर यांनी या तरुणीला त्याचे स्वतःचे सोशल मीडिया हॅन्डल करण्याचे काम देऊन तिच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध (Rape Case) ठेवले होते आणि पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले असे या तरुणीने वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही पहा –
डिसेंबर २०२२ मध्ये सातमकर यांनी लोणावळा येथील मित्राच्या रो हाऊसवर पीडित तरुणीला नेले व त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार (Rape Case) झाला असल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासणी सुरु आहे.
Join Our WhatsApp Community