मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक झाली. सोमवार १ मे रोजी ही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. (Tiger)
(हेही वाचा – Jijamata Udyan : आता राणीच्या बागेत येणार नवे पाहुणे, होणार जागेचा विस्तार)
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ (Tiger) झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० इतकी झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांमध्ये आहे. त्याबद्दल राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच वाघासह वन्यप्राण्यांची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ झाली (Tiger) आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. त्याचसोबत अनेक नेते आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
देशात गेल्या चार वर्षांत वाघांची (Tiger) संख्या २ हजार ९६७ वरून ३ हजार १६७ इतकी झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community